घरट्रेंडिंगराधे माँच्या इशाऱ्यावर झाले होते लैंगिक शोषण - डॉली बिंद्रा

राधे माँच्या इशाऱ्यावर झाले होते लैंगिक शोषण – डॉली बिंद्रा

Subscribe

चंदीगड येथे एका पोलीस अधिकाऱ्याच्या घरात राधे माँच्या इशाऱ्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे आरोप अभिनेत्री डॉली बिंद्राने केला आहे. #metoo मोहीमेचे डॉलीने समर्थन केले आहे.

#metoo मोहीमेअंतर्गत अनेक प्रसिद्ध अभिनेत्रींना आपल्यावर झालेल्या अन्यायाची वाचता केली आहे. #metoo  मोहीमेअंतर्गत रोज एक नवा आरोपाची घटना आपल्या समोर येत आहे. लैेंगिक अत्याचार करणाऱ्यांमध्ये फक्त बॉलिवूड अभिनेतेच नाही तर धर्मगुरूंच्याही नावाचा समावेश झाला आहे. स्वयंघोषित धर्मगुरू राधे माँच्या इशाऱ्यावर आपल्यावर लैंगिक अत्याचार झाला असल्याचा आरोप बॉलिवूड अभिनेत्री डॉली बिंद्राने लावला आहे. यापूर्वी डॉलीने राधे माँ विरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. मात्र #metoo मोहीमेचे समर्थन करत डॉलीने नवीन खुलासा केला आहे. राधे माँने चंदीगड येथे एका पोलीस अधिकाऱ्याच्या घरात आपल्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे आरोप डॉलीने केले आहेत. हे आरोप ट्विटरवरुन करण्यात आले आहेत.

काय आहेत आरोप

अभिनेत्री डॉली बिंद्राने केलेल्या आरोपानुसार २०१५ मध्ये चंदीगडमध्ये राधे माँच्या भक्तांनी डॉलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आले होते. चंदीगड पोलीस अधिकाऱ्यांच्या घरात डॉलीवर लैंगिक अत्याचार झालेत. या घटनेनंतर डॉलीने पोलिसांकडे याची तक्रार केली होती. मात्र अजूनपर्यंत डॉलीला न्याय मिळाला नाही. माझ्याबरोबर झालेल्या अत्याचाराबाबत मी मुख्यमंत्री आणि पंतप्रधांना पत्र लिहिले होते. टल्ली बाबा आणि राधा माँचा मुलगा या दोघांनी माझा  विनयभंग केला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -