घरट्रेंडिंगदिवसाही दिसणार चंद्र, जाणून घ्या कारण

दिवसाही दिसणार चंद्र, जाणून घ्या कारण

Subscribe

उद्या म्हणजेच ४ ऑगस्टपर्यंत दिवसाही चंद्राला पाहता येणार आहे. तज्ज्ञांनी यामागचं नेमकं कारण देखील स्पष्ट आहे.

आपल्याला चंद्राला रात्री पाहण्याचीच सवय आहे. मात्र, या संपूर्ण आठवड्यामध्ये रात्रीबरोबरच दिवसातला बराच वेळही चंद्राने दर्शन दिलं आहे. उद्याही आपण सूर्योदयानंतर चंद्राला स्पष्टपणे पाहू शकतो. चंद्र प्रेमींसाठी ही आनंदाची बातमी म्हणावी लागेल. २७ जुलैला येत्या १० वर्षातलं सर्वात मोठं चंद्रग्रहण झालं होतं. याचाच परिणाम म्हणून २७ जुलै पासून ते ४ ऑगस्टपर्यंत, सूर्योदयानंतरही बराच वेळ चंद्र दिसणार असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. यामगचं कारणही त्यांनी स्पष्ट केलं आहे.  तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसा २७ जुलैच्या चंद्रग्रहणानंतर आता तो Waning Gibbous Phase मध्ये आहे. या फेजमध्ये असताना चंद्र पृथ्वीच्या कक्षेमध्ये अधिक जवळ येतो. चंद्रग्रहणाच्यावेळी चंद्र, सूर्य आणि पृथ्वी एकाच सरळ रेषेत होते. मात्र, आता या Waning Gibbous फेजमध्ये हे तिन्ही ग्रह सरळ रेषेतून बाहेर पडले असून, चंद्र पृथ्वीच्या अधिक जवळून भ्रमण करेल. या फेजमध्ये असताना चंद्राच्या उगवण्याच्या आणि मावळण्याच्या वेळांमधलं अंतर वाढलेलं असतं. त्यामुळे साहाजिकच चंद्र रात्री उशिरा उगवतो आणि दिवसाही उशिरा मावळतो.

Moon-phases-tumblr-transparentनेमक्या याच ज्यामुळे तुम्ही सूर्योदयानंतरही बराच वेळ चंद्रांचं दर्शन घेऊ शकणार आहात. मात्र, उद्यापर्यंतच तुम्ही हा लाभ घेऊ शकणार आहात. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, चंद्र Waning Gibbous Phase मधून हळूहळू बाहेर पडत आहे. त्यामुळे उद्यानंतर दिवसा त्याचं दर्शन होणं दुर्लभ होत जाईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -