घरव्हिडिओनाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे यांची बदली होणार?

नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे यांची बदली होणार?

Related Story

- Advertisement -

राज्य शासनाच्या गृहविभागाकडे बदलीसाठी अर्ज दिल्याची माहिती पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी दिली आहे. त्यामुळे गृहविभागाकडून पोलीस आयुक्त पाण्डेय यांची बदली होणार की नाही, याबाबत पोलीस वर्तुळात चर्चा सुरु आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी केंद्रिय मंत्री नारायण राणे यांच्यावर पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांच्या सूचनेनुसार नाशिक शहर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. राणे यांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात यावेच लागेल, असे पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी भूमिका घेतल्याने ते देशभर चर्चेत आले. रंगपंचमीनिमित्त नाशिक शहरात रहाडींमध्ये रंगोत्सव साजरा केला जातो. रहाडींसाठी पोलीस आयुक्तांनी आयोजकांना परवानगी घेणे बंधनकारक केले. तसेच, नववर्ष स्वागत समितीस गुढीपाडव्यानिमित्त परवानगी घेणे बंधनकारक केल्याने आयोजकांमध्ये पोलीस आयुक्यांबद्दल नाराजीचा सूर उमटला.

- Advertisement -