घरभक्तीGudi Padwa 2022 : गुढीपाडव्याला श्रीखंड का खातात? जाणून घ्या

Gudi Padwa 2022 : गुढीपाडव्याला श्रीखंड का खातात? जाणून घ्या

Subscribe

आपले पूर्वज म्हणायचे की, जी गोष्ट पूर्ण वर्षभर करायची असेल, ती वर्षाच्या पहिल्या दिवशी नक्कीच करावी, म्हणूनच आपल्याकडे गुढीपाडव्याच्या दिवशी गोडा पासून ते कडू पर्यंत सर्व चवींचा समावेश केलेला आहे.

चैत्र महिन्याच्या प्रतिपदेला गुढीपाडव्याच्या दिवसाने मराठी नववर्षाची खरी सुरुवात होते. हिंदू कालदर्शिकेनुसार चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवशी आपण गुढीपाडवा हा सण साजरा करतो. या दिवशी घरोघरी बांबू, रेशमी वस्त्र, कलश, आंब्याची डहाळी, कडूनिंबाची कोवळी पाने, बत्ताशाची माळ यासारख्या आरोग्यास पूरक असलेल्या गोष्टी वापरून आपण गुढी उभारतो. या दिवशी गुढिची सागरसंगीत पूजा केली जाते. बत्ताशाचा प्रसाद वाटला जातो आणि कडुनिंबाची पाने देखील खाल्ली जातात. आपले पूर्वज म्हणायचे की, जी गोष्ट पूर्ण वर्षभर करायची असेल, ती वर्षाच्या पहिल्या दिवशी नक्कीच करावी, म्हणूनच आपल्याकडे गुढीपाडव्याच्या दिवशी गोडा पासून ते कडू पर्यंत सर्व चवींचा समावेश केलेला आहे.

श्रीखंडाचा इतिहास

- Advertisement -

आयुर्वेदात श्रीखंडाला “रसाला” किंवा “शिखरिणी” असे म्हणतात. श्रीखंडा मागे एक पौराणिक कथेची जोड सुद्धा आहे. महाभारतामधील भीम जेव्हा बल्लव, या नावाने स्वयंपाक करीत होता. तेव्हा हा पदार्थ सर्वप्रथम त्याने तयार केला. या पदार्थाच्या सेवनामुळे श्रीकृष्णाला झोप आली. श्रीच्या दैनंदिन कार्यात यामुळे खंड पडला, म्हणूनच हा पदार्थ ‘श्रीखंड’ म्हणून ओळखला जातो.

 गुढी पाडव्याला श्रीखंडच का खायचे?

- Advertisement -

उन्हाळ्यातील उष्णतेचा सामना करताना शरीरात थकवा येऊ नये, शरीरात शक्‍ती टिकून राहावी यासाठी श्रीखंड हे एका रसायना प्रमाणे काम करते. म्हणजेच उन्हाळ्यात कडक उन्हामुळे ज्याचे शरीर अगदी कमजोर झाले आहे, ज्यांच्यात अजिबात उत्साह नाही, ज्यांना शरीरात ताकद हवी असेल त्यांच्यासाठी श्रीखंड खाणं अतिशय उत्तम आहे.

श्रीखंड पचायला थोडे जड असते,तसेच हा थोडा आंबवलेला पदार्थ आहे, त्यामुळे आयुर्वेदाने श्रीखंडाला लागणारे घटक आणि ते बनविण्याची कृती व्यवस्थित सांगून ठेवलेली आहे. पण आजकाल बरेच जण आयुर्वेदिक विधी न वापरता श्रीखंड बनवतात. यामुळे श्रीखंड शरीरास बाधते.

आयुर्वेदीक पद्धतीने श्रीखंड कसे बनवावे?

  • सर्वप्रथम छान दही लावून घ्यावे ते कधीही आंबट असू नये याची काळजी घ्यावी, दही लागल्यानंतर सुती वस्त्रात पुरचुंडी बांधून ठेवावी व ते 7-8 तासांसाठी टांगून ठेवावे.
  • दह्यातील सर्व पाणी निघून गेले की त्याला चक्का असं म्हणतात.
  • त्यानंतर या आयुर्वेदिक श्रीखंडामध्ये, चक्का हा खडीसाखरे (मिक्सर ला बारीक करून घेणे) बरोबर फेटायचा आणि फेटायच्या भांड्याला कापराने धुपवायचे.
  • श्रीखंड पचविण्यासाठी लागणारा अग्नी त्यात मधरूपाने समाविष्ट होतो, श्रीखंडाच्या अन्नशुद्धीसाठी त्यात तूप सुद्धा टाकावे.
  • त्यानंतर त्यात दालचिनी, नागकेशर, वेलची, मिरीपावडर, तमालपत्र, सुंठ या सर्वांची पावडर मिक्स करा.
  • त्यानंतर त्यात थोडं केसर दूध घालाव म्हणजे तुमचे आयुर्वेदिक श्रीखंडाला केसराचा सुगंध आणि स्वाद येईल.
    अशा प्रकारे तुमचे आयुर्वेदिक श्रीखंड तयार होईल.

हेही वाचा : गुढीपाडव्यापासून सुरू होणाऱ्या चैत्र नवरात्रीच्या उपवासांमध्ये ट्रॉय करा साबुदाण्याचे अप्पे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -