घरव्हिडिओमनसेकडून खासगी हॉस्पिटलची पोलखोल

मनसेकडून खासगी हॉस्पिटलची पोलखोल

Related Story

- Advertisement -

कोरोनाच्या विषाणूवर अजूनही लस आलेली नाही. सरकारने कोरोना रुग्णांसाठी अनेक सुविधा आणि विमा कवच जाहीर केले असतानाही वेदंतसारख्या खासगी हॉस्पिटलमध्ये कोरोना रूग्णांची बिलाच्या नावाखील लूट होत असल्याचा भांडाफोड मनसेने केला आहे. मनसेच्या सरचिटणीस रिटा गुप्ता आणि योगेश चिले यांनी रिटा गुप्ता यांच्या फेसबुक पेजवर १८ मे रोजी केलेल्या फेसबुक लाईव्हमध्ये हा विषय मांडला आहे. लाखोंच्या घरात रुग्णांकडून पैसे आकारले जात असून ते भरल्याशिवाय रुग्णाचा मृतदेह देखील ते हॉस्पिटलबाहेर जाऊ देत नसल्याची असंवेदनशीलता त्यांच्यात असल्याचे यामध्ये सांगितले आहे. तसेच राज्य सरकार आणि आरोग्य मंत्री हे सर्व प्रकार थांबवण्यास निष्क्रिय असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. ‘गंदा है पर धंदा है’, असा टॅग त्यांनी या खासगी हॉस्पिटल्सवर लावला आहे.

- Advertisement -