घरव्हिडिओआक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी बंडातात्या कराडकरांविरोधात गुन्हा दाखल

आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी बंडातात्या कराडकरांविरोधात गुन्हा दाखल

Related Story

- Advertisement -

राज्य सरकारच्या वाईन विक्रीच्या निर्णयामुळे आता राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपासह अनेकांनी या निर्णयाविरोधात आंदोलन केले. यात ह. भ. प. बंडातात्या कराडकर (Bandatatya Karadkar) यांनीही या निर्णयावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक नेत्यांवर टीका केली आणि त्यावरून चांगलाच गदारोळ झाला आहे. नेत्यांची मुलं दारू पितात असं वक्तव्य बंडातात्या यांनी केलं होतं. दरम्यान आज साताऱ्यातील पिंपरजमधील मठात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच राज्य महिला आयोगानेही त्यांना नोटीस धाडली आहे. त्यामुळे सातारा पोलिसांची टीम त्यांना अटक करण्यासाठी साताऱ्याच्या पिंपरजमधील मठात दाखल झाले आहे.

- Advertisement -