अमरावती लोकसभा मतदारसंघातून भाजपने नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर केली. मात्र, भाजपने नवनीत राणांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी नाराजी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे नवनीत राणांच्या उमेदवारीला विरोध करत बच्चू कडू हे नवी खेळी खेळण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत.