घरव्हिडिओठाकरे गटाचा पाठिंबा, मविआच्या पाठिंब्यासाठी प्रयत्नशील - शुभांगी पाटील |

ठाकरे गटाचा पाठिंबा, मविआच्या पाठिंब्यासाठी प्रयत्नशील – शुभांगी पाटील |

Related Story

- Advertisement -

नाशिक पदवीधर मतदारसंघात शिवसेनेच्या ठाकरे गटाचा पाठिंबा असलेल्या उमेदवार शुभांगी पाटील सकाळपासून नॉट-रिचेबल होत्या. शुभांगी पाटील आणि त्यांच्या पतीचा मोबाईल सकाळपासून बंद असल्याची माहिती निकटवर्तीयांकडून आली होती. शिवाय, उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने शुभांगी पाटील अर्ज मागे घेऊ शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. मात्र या चर्चांना शुभांगी पाटील यांनी पूर्णविराम दिला आहे. आज दुपारच्या सुमारास शुभांगी पाटील यांनी नाशिक आयुक्त कार्यालयात हजेरी लावत आपली उमेदवारी कायम असल्याचे सांगितले.

- Advertisement -