घरताज्या घडामोडीदिल्लीत दोन दहशतवाद्यांना अटक; शिवसेना, काँग्रेसबाबत समोर आले धक्कादायक खुलासे

दिल्लीत दोन दहशतवाद्यांना अटक; शिवसेना, काँग्रेसबाबत समोर आले धक्कादायक खुलासे

Subscribe

दिल्ली पोलिसांनी जहांगीपुरी भागात मोठी कारवाई केली आहे. दिल्ली पोलिसांनी या भागातून दोन दहशतवाद्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी हातबॉम्बदेखील जप्त केले आहेत. दरम्यान, या चौकशीतून शिवसेना आणि काँग्रेस पक्षाबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या दहशतवाद्यांच्या निशाण्यावर काँग्रेस, शिवसेना आणि बजरंग दलाचे काही नेते असल्याचे पुढे आले आहे. या कामासाठी त्यांना मोठी रक्कम देण्यात येणार होती, असंही सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांनी दहशतवाद्यांची चौकशी केली. यावेळी दहशतवाद्यांनी कबूल केलं की, या टार्गेट किलिंगसाठी त्यांना पाच लाख रुपये मिळाले आहेत. ही रक्कम हवालाद्वारे त्यांच्यापर्यंत पोहोचली आहे. दहशतवादी संघटनेनं ज्या नेत्यांना टार्गेट केलं आहे त्यांच्याबद्दलची संपूर्ण माहिती मिळाली आहे. तसेच त्या आधारे त्यांनी संबंधित नेत्यांवर पाळत ठेवण्याचं कामही सुरू केलं होतं. फक्त प्लॅनची अंमलबजावणी कधी होणार?, यासाठी हे दहशतवादी वाट पाहत होते.

- Advertisement -

या दोन्ही दहशतवाद्यांचे उल अन्सार आणि खलिस्तान टायगर फोर्स या संघटनांशी संबंध असल्याची माहिती दिल्ली पोलिसांकडून देण्यात आली आहे. तसेच या संघटनांना पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयचे समर्थन असून भारतात दहशतवादी हल्ला करण्याचा कट या संघटनातर्फे केल्या जात असल्याचा दावाही पोलिसांनी केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांचं नाव जगजीत आणि नौशाद असल्याचं सांगितलं जात आहे. येत्या २७ जानेवारीला बजरंग दलाच्या नेत्याच्या हत्येनंतर दुसरी हत्या ३१ जानेवारीला होणारी होती. ३१ जानेवारीला काँग्रेसच्या एका मोठ्या नेत्याची हत्या होणार होती. त्यानंतर शिवसेनेच्या एका नेत्याला मारण्याचं तिसरं टार्गेट होतं, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

- Advertisement -

डेमोसाठी पाठवला होता व्हिडीओ

दिल्ली स्पेशल सेलला मिळालेला व्हिडीओ दहशतवाद्यांनी डेमो म्हणून कॅनडामध्ये बसलेल्या हँडलरला पाठवला होता. एका तरुणाची हत्या केल्याचा हा व्हिडिओ आहे. व्हिडिओच्या माध्यमातून या दहशतवाद्यांनी आपला हेतू भयंकर असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.


हेही वाचा : आपला मुद्दा हायकोर्टात मांडा; जोशीमठ संकटावर सुप्रीम कोर्टाने सुनावणीस दिला नकार


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -