घरमहाराष्ट्रआता सेनेने भाजपाच्या प्रभावाखाली राहायचं की नाही? हे ठरवावं - थोरात

आता सेनेने भाजपाच्या प्रभावाखाली राहायचं की नाही? हे ठरवावं – थोरात

Subscribe

राज्यात सत्ता स्थापन करताना शिवसेने ठरवावं काय करायचं ते? तसंच राज्यात शिवसेनेसोबत सत्तास्थापन करण्यासाठी आम्ही पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाकडून परवानगी घेऊ, असं बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं.

सध्या विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर आल्यानंतर भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात वेगळी आघाडी निर्माण होण्याबाबत तर्क वितर्क लावले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व नवनिर्वाचित आमदार बाळासाहेब थोरात यांनी सूचक असं विधान केलं आहे. थोरात याबाबत असं म्हणाले की, ‘भाजपाच्या प्रभावाखाली राज्यात सत्ता स्थापन करताना राहायचं की नाही? त्यांना किती घाबरायचं? याचा निर्णय शिवसेनेने आधी घ्यावा. जर आमच्याकडे प्रस्ताव आला तर आम्ही केंद्रीय नेतृत्वाची परवानगी घेऊ.’ या विधानामुळे राज्यात नवीन राजकीय समीकरणे उदयाला येण्याची चिन्हे दिसत आहे.

यावेळी राज्यभरात वेळ देत असताना आपल्या स्वतःच्या संगमनेर मतदारसंघात वेळ देता आला नाही. पण ही निवडणूक जनतेने आणि कार्यकर्त्यांनी लढवली. त्यामुळे आपण विजयी झालो असल्याचे थोरात यांनी सांगितलं. आता राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी काहीही घाई नाही, योग्य वेळी निर्णय घेण्याची भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.

- Advertisement -

यासंदर्भात थोरात यांनी अशी भूमिका मांडली की, राज्यात शिवसेनेसोबत सत्तास्थापन करण्यासाठी आम्ही पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाकडून परवानगी घेऊ. पण याआधी शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट करावी. शिवसेनेने भाजपाला घाबरायचे की नाही? हे सर्वस्वी त्यांनी ठरवावे. अनेक नेते जेव्हा पक्ष सोडून जात असताना तेव्हा आपल्यावर तीन महिन्यांपूर्वी राज्याची जबाबदारी काँग्रेस पक्षाने टाकली. ही जबाबदारी पुरेपूर निभावण्याचा प्रयत्न केल्याचे थोरात यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -