घरमुंबईकल्याणमध्ये मतदारांमध्ये सकाळी निरुत्साह, दुपारनंतर उत्साह

कल्याणमध्ये मतदारांमध्ये सकाळी निरुत्साह, दुपारनंतर उत्साह

Subscribe

कल्याण लोकसभा मतदारसंघात डोंबिवली, कल्याण ग्रामीण, कल्याण पूर्व, उल्हासनगर अंबरनाथ आणि मुंब्रा कळवा ही सहा विधानसभा मतदारसंघ येतात. सकाळपासून मतदारांमध्ये निरुत्साह होता. मात्र संध्याकाळ नंतर मतदारांमध्ये उत्साह दिसून आला. पावसाने उसंत घेतल्याने मतदार मतदानासाठी घरा बाहेर पडले होते.

विधानसभेसाठी सोमवारी मतदान पार पडले. मात्र, लोकसभेला मतदारांचा जितका प्रतिसाद होता तसा प्रतिसाद यावेळी दिसून आला नाही. सकाळपासून मतदारांमध्ये निरुत्साह होता. मात्र संध्याकाळ नंतर मतदारांमध्ये उत्साह दिसून आला. पावसाने उसंत घेतल्याने मतदार मतदानासाठी घरा बाहेर पडले होते. कल्याण लोकसभा मतदारसंघात डोंबिवली, कल्याण ग्रामीण, कल्याण पूर्व, उल्हासनगर अंबरनाथ आणि मुंब्रा कळवा ही सहा विधानसभा मतदारसंघ येतात. सकाळी सात वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. मागील दोन दिवसांपासून पाऊस पडल्याने मतदानाच्या दिवशी पाऊस पडण्याचे भाकीत हवामान खात्याकडून वर्तविले गेले होते. त्यामुळे पाऊस पडल्यास मतदार घराबाहेर पडतील का? अशी शंका-कुशंका उपस्थित करण्यात आली होती. मात्र सकाळपासून पावसाने उसंत घेतल्याने सर्वच राजकीय पक्षासह मतदारांनी सुटकेचा निःश्वास सोडला होता.

हेही वाचा – गडचिरोलीत नक्षलवाद्यांना नागरिकांचा घरचा आहेर; न घाबरता केलं मतदान

- Advertisement -

शेवटच्या दोन तासांत मतदान केंद्राबाहेर रांग

लोकसभा निवडणुकीच्या वेळी सकाळ पासूनच मतदान केंद्राबाहेर रांग लागल्या होत्या. मात्र विधानसभा निवडणुकीला सकाळ पासूनच संथ गतीने मतदान सुरू होते. ही परिस्थिती सर्वच मतदार संघात पाहावयास मिळाली. संध्याकाळी चार नंतर मात्र मतदार घराबाहेर पडले. त्यामुळे शेवटच्या दोन तासांत मतदान केंद्राबाहेर रांग लागल्याचे दिसून आले. त्यामुळे दुपारनंतर निरुत्साहाचे उत्साहात रूपांतर झाल्याचे दिसून आले. कल्याण पश्चिमेतील एक मतदान केंद्रावरील ईव्हीएम यंत्रात बिघाड झाली होती. मात्र तातडीने हे तंत्र बदलण्यात आले. मतदारांना मतदान केंद्रापर्यंत सोडण्यासाठी अनेक उमेदवारांनी रिक्षेची सोय करण्यात आली होती.

हेही वाचा – मतदानासाठी काहीपण! ट्रॅक्टरची ट्रॉली जोडून मतदारांसाठी पाण्यात बनला पूल

- Advertisement -

बोगस मतदान झालं

डोंबिवलीत दोन मतदारांच्या नावावर बोगस मतदान झाल्याचे उघडकीस आले. मदन शर्मा या मतदाराचे साऊथ इंडियन शाळेर मतदान होते. मात्र ते मतदान करण्यासाठी गेले असता त्यांचा नावावर मतदार झाल्याचे सांगण्यात आले. त्यावेळी संतप्त शर्मा यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना जाब विचारून पुन्हा मतदान करण्याची संधी द्यावं अशी विनंती केली. मात्र त्यांची विनंती फेटाळून लावीत त्यांना धक्के मारून मतदान केंद्रातून हुसकावून लावले. तसेच बोगस मतदान झाल्याच्या यासंदर्भात पोलिसांकडे तक्रार केली असता त्यांनीही तक्रार घेतली नसल्याची माहिती शर्मा यांनी दिली. लोकसभेच्या निवडणुकीतही शर्मा यांच्या नावावर बोगस मतदान झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच एका महिलेच्या नावावरही बोगस मतदान झालं. मात्र त्या महिलेने नाव न छापण्याच्या अटीवर ही माहिती दिली.

हेही वाचा – दोन्ही हात नसूनही शेतकऱ्याचं मतदान

नावांचा घोळ कायम

प्रत्येक निवडणुकीत मतदार यादीत नावांचा घोळ होत असतो. यावेळीही हा घोळ दिसुन आला. मात्र त्याचे प्रमाण कमी होते. मतदार यादीत नाव नसने, नाव आडनावात बदल अश्या अनेक चूक होत्या. त्यामुळे या मतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागले. राजकीय पक्षांकडून लावण्यात आलेल्या बुथवर नावे शोधण्यासाठी मतदारांनी गर्दी केली होती

खाजगी कर्मचारी कामावर

मतदानाची सुट्टी जाहीर करण्यात आली होती. रविवार आणि सोमवार असे सलग 2 दिवस सुट्टी मिळाल्याने अनेकांनी फिरायला जाण्याचे बेत केले होते तसेच खाजगी कंपन्यांमध्ये काम करणारे कामावर गेले होते. त्यामुळेही अनेकांना मतदान प्रक्रियेत सहभाग घेता आले नाही.

मतदारांना आकर्षित करण्यासाठी मतदान केंद्रांवर रांगोळ्या

एकीकडे मतदानाची टक्केवारी कमी होत चालली असून अधिकाधिक लोकांनी मतदान करावे यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून डोंबिवली स. वा. जोशी शाळेत सखी मतदार केंद्र उभारण्यात आलं होत. या मतदार केंद्रात सर्व महिला केंद्र सांभाळत असून हे मतदान केंद्र सजवण्यात आल होत. या केंद्रात फुग्यांची आरास करण्यात आली असून सुंदर अशी रंगोळीही काढण्यात आली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -