घरमहाराष्ट्रमतदानासाठी काहीपण! ट्रॅक्टरची ट्रॉली जोडून मतदारांसाठी पाण्यात पूल

मतदानासाठी काहीपण! ट्रॅक्टरची ट्रॉली जोडून मतदारांसाठी पाण्यात पूल

Subscribe

बारामतीच्या काबंळेश्वर येथील स्थानिकांनी मतादानासाठी स्तुत्य उपक्रम केला. गावकऱ्यांनी ट्रक्टरच्या सहा ट्रॉली जोडून मतदारांसाठी पाण्यात पूल बनवला.

गेल्या दोन दिवसांपासून राज्यात पावसाचे सावट आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये आजही पाऊस पडला. त्यामुळे मतदान केंद्रांजवळ पाणी साचले आहे. या पाण्यात मतदानासाठी रांगेत कसे उभे राहायचे? असा प्रश्न मतदारांना साहजिकच पडणार. मात्र, बारामतीच्या काबंळेश्वर येथील स्थानिकांनी मतादानासाठी स्तुत्य उपक्रम केला. गावकऱ्यांनी ट्रक्टरच्या सहा ट्रॉली जोडून मतदारांसाठी पाण्यात पूल बनवला आहे. हा पूल साधारणत: ५० फुटांचा आहे.

- Advertisement -

राज्यभरात सकाळी सात वाजेपासून विधानसभेचे मतदान सुरु आहे. मतदान सुरु असताना अनेक ठिकाणी पावसाचे सावट आहे. काही भागांमध्ये अजूनही पाऊस पडत आहे. त्यामुळे लोकांनी मतदानाकडे पाठ फिरवल्याचे बघायला मिळत आहे. दुपारी तीन वाजेपर्यंत राज्यात एकूण ४३.७८ टक्के मतदान झाल्याची माहिती समोर आली आहे. मतदारांनी मतदानाकडे फिरवलेली पाठ ही चिंतेची बाब असल्याचे सर्वत्र बोलले जात आहे.


हेही वाचा – दोन्ही हात नसूनही शेतकऱ्याचं मतदान

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -