घरटेक-वेकJio चे सर्वात स्वस्त डेटा पॅक झाले बंद; ग्राहक नाराज

Jio चे सर्वात स्वस्त डेटा पॅक झाले बंद; ग्राहक नाराज

Subscribe

IUC चार्ज प्लॅन नंतरच कंपनीने १९ आणि ५२ रुपयांचे रिचार्ज पॅक बंद

दूरसंचार क्षेत्रातील दिग्गज कंपनी रिलायन्स जिओने IUC चार्ज लावल्यानंतर पुन्हा एकदा ग्राहकांना मोठा धक्का बसला आहे. IUC चार्ज प्लॅन नंतरच कंपनीने १९ आणि ५२ रुपयांचे रिचार्ज पॅक बंद केले आहेत. जिओने १० ऑक्टोबरला IUC चे चार पॅक भारतीय बाजारात बाजारात आणले होते. इतर नेटवर्कवर अधिक कॉल करणारे ग्राहक हे पॅक रिचार्ज करणार आहे. याव्यतिरिक्त, ग्राहकांना या प्लॅनमध्ये अतिरिक्त डेटा देखील मिळणार आहे.

असा होता डेटा प्लॅन

बंद केलेल्या १९ रुपयांच्या रिचार्जवर अमर्यादित कॉलिंग आणि १५० एमबी डेटा मिळत होता. तसेच त्याशिवाय २० SMSची सुविधाही देण्यात आली होती. दुसरीकडे ५२ रुपयांच्या रिचार्जवर ग्राहकाला १ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलची सुविधा मिळते. त्याशिवाय ७० SMS चाही लाभ मिळत होता. परंतु जिओनं आता हे दोन्ही प्लॅन्स बंद केले आहेत. मात्र ग्राहकांना १० ते १००० रुपयांचे IUC टॉप-अप रिचॅर्ज पॅक उपलब्ध आहेत.

- Advertisement -

२०२० मध्ये पुन्हा लाँच होणार असा प्लॅन

बंद केलेले दोन्ही रिचार्ज प्लॅन कंपनी २०२० मध्ये पुन्हा लाँच करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच, १ जानेवारी २०२० पासून ट्राय IUC दर घालवण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, अद्यापपर्यंत ट्रायकडून आययूसीबाबत काहीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -