घरमुंबईप्रदीप शर्मांसाठी नालासोपार्‍यात नाम-बदनाम्यांची फौज रिंगणात

प्रदीप शर्मांसाठी नालासोपार्‍यात नाम-बदनाम्यांची फौज रिंगणात

Subscribe

पोलीस खात्यातून थेट विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्यासाठी नालासोपार्‍यासह वसईतील माजी पोलिसांबरोबरच विद्यमान पोलीस अधिकारी कामाला लागले आहेतच. याशिवाय नालासोपारा आणि वसईतील बदनामांची फौजही शर्मांसाठी रिंगणात येऊ लागली आहे. मुंबईत राहणार्‍या शर्मांनी नालासोपार्‍यातील बड्या बिल्डरचा बंगला तात्पुरता राहण्यासाठी ताब्यात घेतला आहे. तिथे त्यांची पत्नी आणि आईचे वास्तव्य सुरू झाले आहे.

शर्मा यांना नालासोपार्‍यातून सेनेची उमेदवारी मिळण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आणि शिवबंधनात अडकले. उमेदवारी देण्याचे आश्वासन प्रदीप शर्मा यांना मिळाल्यापासून ते कामाला लागले आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकारी त्यांच्यासाठी कामाल लागले आहेत. शर्मा यांचे जवळचे सहकारी आणि एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक सध्या एटीएसमध्ये कार्यरत आहेत. स्वत: नायक शर्मांसाठी प्रयत्नाला लागले आहेत. याशिवाय नालासोपार्‍यातील पोलीस उपाधिक्षक कुलकर्णीही शर्मांसाठी प्रयत्नांची शिकस्त करत आहेत. याशिवाय मुंबई आणि नालासोपारा पोलीस दलातील अनेक अधिकारीही शर्मांसाठी काम करण्याच्या तयारीत आहेत.

- Advertisement -

शर्मा यांचे विश्वासू राजू पाटील यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आल्याचे सांगितले जाते. सेनेचे विधानपरिषद सदस्य रवी पाठक यांच्याकडे शर्मांच्या निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली आहे. महानगरपालिकेच्या सत्तेतील नाराज नगरसेवकांना आपलेसे करण्यासाठी पाठक त्यांच्याशी बोलणार आहेत. शर्मांना स्थानिक उत्तरभारतीय मतदारांच्या मतांसाठी उत्तर भारतीय खासदार मनोज तिवारी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना नालासोपारात आणण्याची तयारी पाठक यांनी सुरू केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -