राजकारण कधी सोडणार? कार्यकर्त्यांचा नवज्योत सिंह सिद्धुला सवाल

कार्यकर्त्यांच्या सवालला नवज्योत कशाप्रकारे सामोरे जातील, याकडे अनेकांचे लक्ष वेधले गेले आहे. नवज्योत सिंह सिद्धू खरच राजीनामा देणार का? असा प्रश्नही उपस्थित झाला आहे.

navjot singh sidhu
राजकारण कधी सोडणार? कार्यकर्त्यांचा सिद्धुला पोस्टरबाजीतून सवाल

लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधींचा अमेठीतून पराभवानंतर राजकारण सोडू देईल, असे नवज्योत सिंह सिद्धू यांनी घोषणा केली होती. मात्र, राहुल यांचा अमेठीतून पराभार झाला असूनही नवज्योत सिंद्धू राजकारणात सक्रिय आहेत. यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांनी लुधियाना येथे पोस्टर लावून नवजोत यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.

नुकतीच लोकसभेची निवडणूक पार पडली. या निवडणूक मोठी हालचाल पाहायाला मिळाली. कॉंग्रेसचा बालकिल्ला असलेल्या अमेठी मतदारसंघातून गांधी कुंटुंबाचा कधिच पराभाव झाला नाही. नवज्योत यांनी याच जोरावर भाजपच्या विरोधात घोषणा केली होती. “अमेठी मतदारसंघातून राहुल गांधीचा पराभाव झाला तर, मी राज कारण सोडेल.” असे ते म्हणाले होते. परंतु, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजप नेत्या स्मृती इराणी यांनी राहुल गांधीचा दणदणीत पराभाव केला. मात्र, नवज्योत सिद्धु यांनी अजूनही राजकारण सोडले नाही, असे पोस्टर भाजप पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पंजाबयेथील लुधियाना येथे लावले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर नवज्योत सिंह सिद्धू यांना सोशल मीडियावर अधिकच ट्रोल करण्यात आले होते.

अमेठी लोकसभा निवडणूक २००९

लोकसभा निवडणूक २००९ मध्ये अमेठी मतदारसंघातून राहुल गांधी यांच्या विरोधात भारतीय समाज पक्षाकडून अशीष शुक्ला आणि भाजपकडून प्रदिप कुमार सिंह यांना उमेदवारी मिळाली होती. या निवडणूकीत राहुल गांधी यांना ४ लाख ६४ हजार १९५ मत मिळाले होते. अशीष शुक्ला यांना ९३ हजार ९९७ मत मिळवले होते तर, प्रदिप कुमार सिंह ३७ हजार ५७० मत मिळवता आले होते. राहुल गांधींना अशीष शुक्ला यांच्या तुलनेत ३ लाख ७० हजार १९८ मत अधिक मिळाले होते.

अमेठी लोकसभा निवडणूक २०१४

२०१४ मधील लोकसभा निवडणूकीत राहुल गांधी यांना स्मृती इराणी यांच्याकडून जोरदार टक्कर मिळाली होती. लोकसभा निवडणूक २०१४ मध्ये अमेठी मतदारसंघातून राहुल गांधी यांच्य विरोधात भाजपच्या स्मृती इराणी आणि भारतीय समाजवादी पक्षाकडून धमेंद्र प्रताप सिंह तर, आम आदमी पक्षाकडून डॉ. कुमार विश्वास यांना उमेदवारी देण्यात आली होती. या निवडणूकीत राहुल गांधी यांना ४ लाख ८ हजार ६५१ मत मिळाले होते. स्मृती इराणी यांना ३ लाख ७४८ मत मिळवता आले होते. धमेंद्र प्रताप सिंह यांना ५७ हजार ७१६ मत मिळवता आले होते, तर डॉ. कुमार विश्वास यांना २५ हजार ५२७ मत पडले होते. महत्त्वाचे म्हणजे राहुल गांधी यांना स्मृती इराणी यांच्या तुलनेत १ लाख ७ हजार ९०३ मत अधिक मिळाले.

कोणत्याच पक्षाच्या उमेदवाराने अमेठीमधून राहुल गांधी यांना टक्कर दिली नाही. परंतु २०१४ मधील लोकसभेच्या निकालावर नजर टाकली, तर स्मृती इराणी यांनी राहुल गांधींची डोकेदुखी वाढवली होती. एवढेच नव्हे तर, लोकसभा निवडणूक २०१९ मध्ये स्मृती इराणींनी राहुल गांधींना ५५ हजार १२० मताने पराभूत केले आहे.