घरमुंबईदुकानांच्या बाहेरील अंतर्वस्त्र विक्रीची जाहिरात बंद करा; महिला शिवसैनिकांची मागणी

दुकानांच्या बाहेरील अंतर्वस्त्र विक्रीची जाहिरात बंद करा; महिला शिवसैनिकांची मागणी

Subscribe

दुकानाबाहेर प्रदर्शनासाठी लावलेल्या महिलांच्या अंतर्वस्त्रांच्या जाहिरातीची पोस्टर्स फाडून महिलांचे असणारे पुतळे हटवत महिला शिवसैनिकांनी आंदोलन

दुकानांच्या दर्शनी भागांत तसेच दुकानाबाहेर पदपथावर उत्पादकांची जाहिरात करण्यासाठी मेनीक्वीन म्हणजे स्त्री देहाच्या प्रतिकृतींसह कोणतेही पुतळे ठेवण्यास तसेच टांगण्यास प्रतिबंध करण्यात यावा, तसेच असा गुन्हा करणाऱ्यांविरोधात जास्तीत जास्त दंडात्मक कारवाई करण्याची मागणी मे २०१३ मध्ये तत्कालिन भाजपाच्या नगरसेविका रितू तावडे यांनी केली होती. मात्र यांसंदर्भात कोणतीही दखल घेण्यात आली नाही.

- Advertisement -

अंतर्वस्त्रांच्या जाहिरातीचे पोस्टर्स आणि पुतळे हटवा

विलेपार्ले पुर्वेला असणाऱ्या बाजारपेठेत महिलांच्या अंतर्वस्त्रांची विक्री करणाऱ्या दुकानांना महिला शिवसैनिकांनी चांगलाच हिसका दाखवला आहे. यावेळी दुकानाबाहेर प्रदर्शनासाठी लावलेल्या महिलांच्या अंतर्वस्त्रांच्या जाहिरातीची पोस्टर्स फाडून महिलांचे असणारे पुतळे हटवत महिला शिवसैनिकांनी आंदोलन केले. हे आंदोलन करताना दुकानाबाहेर महिलांच्या अंतर्वस्त्रांच्या जाहिरातीचे पोस्टर्स आणि पुतळे यापुढे लावू नयेत, असे निवेदन दुकानाच्या मालकांना दिले. या निवेदनासोबत महापालिका नियमांची अंमलबजावणी करा, असे महिला शिवसैनिकांनी दुकानदारांना सूचना देखील दिल्या आहे.

माहापलिका विधी समितीकडून कोणताही अभिप्राय नाही

भाजपच्या तत्कालीन नगरसेविका रितू तावडे यांनी २०१३-१४ मध्ये, दुकानाबाहेर मेनीक्वीन लावण्यात येऊ नये, तसेच तेसे आढळल्यास महापालिकेकडून कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली होती. मात्र या मागणीवर माहापलिका विधी समितीकडून कोणताही ठोस अभिप्राय मिळत नसल्याने या मागणीचा प्रस्ताव प्रशासनाकडे वारंवार पाठवण्यात येत आहे.

- Advertisement -

अधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश असताना कारवाई नाही

याबाबतचा प्रस्ताव मागील विधी समितीत मांडण्यात आला होता असून विधी समिती अध्यक्षा शीतल म्हात्रे यांनी कारवाईचे आदेश अधिकाऱ्यांना दिले होते. परंतु , दुकानाबाहेर मेनीक्वीन लावलेले आढळल्यास त्यावर कारवाईचे अधिकार महापालिकेला नाही. त्यामुळे ते कोणत्याही प्रकारची कारवाई करत नव्हते, असे सांगण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -