‘आरएसएसने देखील मोदींची साथ सोडली’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारची नाव बुडत आहे. याचा जीवंत उदाहरण हे आहे की, आरएसएसने देखील त्यांची साथ सोडली असल्याचा आरोप मायावती यांनी केला आहे.

Uttar pradesh
Narendra Modi
पंतप्रधान नरेंद्र मोदी

बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्ष मायावती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. या निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नाव बुडाली आहे आणि राष्ट्रीय स्वंयसेवक संघाने देखील पंतप्रधानांची साथ सोडली असल्याचा आरोप मायावती यांनी केला आहे. मंगळवारी मायावती यांनी ट्विट करत थेट नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले आहे.

मायावतींनी केले मोदींना लक्ष्य

मायावती यांनी असे सांगितले की, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारची नाव बुडत आहे. याचा जीवंत उदाहरण हे आहे की, आरएसएसने देखील त्यांची साथ सोडली आहे. मोदींच्या खोटारडेपणामुळे जनतेचा विरोध पाहता आरएसएस निवडणुकीमध्ये मेहनत करताना दिसत नाही. त्यामुळे मोदींना आता घाम फूटू लागला आहे.’

देशाला स्वच्छ पंतप्रधान पाहिजे

दुसऱ्या एका ट्विटमध्ये मायावती यांनी असे म्हटले आहे की, जनतेच्या लांगुलचालनासाठी काही नेत्यांनी सेवक, मुख्यसेवक, चहावाला आणि चौकीदार आदी रुपे धारण केलीत . आता देशाला  कल्याणकारी स्वच्छ पंतप्रधान पाहिजे. जनतेने अशा दुहेरी चरित्र असलेल्यांकडून खूप फसवणूक झाली आहे. यापुढे त्यांची फसवणूक होणार नाही.

रोड शो, पुजा करणे ही नवीन फॅशन

या व्यतिरिक्त मायावती यांनी निवडणूकीसाठी रोड शो आणि पूजा-पाठ करणाऱ्यांना देखील लक्ष्य केले आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, रोड शो आणि ठिकठिकाणी पुजा-पाठ करणे ही एक नवी निवडणूक फॅशन झाली आहे. यावर मोठा खर्च केला जातो. निवडणुक आयोगाने या खर्चाचा समावेश उमेदवाराच्या खर्चामध्ये केला पाहिजे. जर कोणत्याही पक्षाद्वारे उमेदवाराच्या समर्थनार्थ रोड शो केला जात असेल तर त्या खर्चाचा समावेश देखील त्या पक्षाच्या खर्चामध्ये केला पाहिजे.