घरदेश-विदेशभयंकर!! आईच्या मृतदेहासोबत त्यानं काढले १८ दिवस

भयंकर!! आईच्या मृतदेहासोबत त्यानं काढले १८ दिवस

Subscribe

आईच्या मृतदेहासमोर तब्बल १८ दिवस बसून राहिल्याचा धक्कादायक प्रकार कोलकाता येथे समोर आला आहे.

अत्यंत धक्कादायक अशी घटना पश्चिम बंगालमध्ये समोर आली आहे. आईच्या मृतदेहासोबत ३० वर्षीय व्यक्तीनं तब्बल १८ दिवस काढल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. परिसरामध्ये दुर्गंधी पसरल्यानंतर शेजाऱ्यांनी याबाबतची खबर पोलिसांना दिली. त्यानंतर हा प्रकार उजेडात आला आहे. घटनास्थळी धाव घेत पोलिसांनी दरवाजा तोडला. त्यानंतर सारा प्रकार पाहून पोलिसांना देखील धक्का बसला. रविवारी हा सारा प्रकार उडेडात आला. कोलकातातील सॉल्ट लेक परिसरामध्ये राहणाऱ्या क्रिष्णा भट्टाचार्य वय वर्षे ७० यांचं निधन झालं. त्यानंतर त्यांचा मुलगा मैत्रियो भट्टाचार्य हा तब्बल १८ दिवस क्रिष्णा यांच्या मृतदेह शेजारी बसून होता. दरम्यान, मैत्रियो हा बेरोजगार आहे. याप्रकरणी पोलिस आणखी तपास करत आहेत. चौकशी दरम्यान आईनं घरीच अग्नि देण्यास सांगितलं होतं असं मैत्रियो यानं सांगितले आहे. क्रिष्णा या पेशानं शिक्षिका होत्या. त्याच्या पतीचे देखील वर्षभरापूर्वी निधन झालं आहे.

मैत्रियो याचं शेजाऱ्यांशी देखील पटत नव्हतं. कोणत्या तरी कारण्यावरून त्यांच्यामध्ये सतत भांडणं होत होती. त्यामुळे शेजारी देखील त्याला टाळत होते. यापूर्वी देखील अशाच प्रकारच्या घटना या पश्चिम बंगालमध्ये समोर आलेल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -