घरदेश-विदेशभाजपविरोधात विरोधकांची रणनिती ठरणार, आज बैठक

भाजपविरोधात विरोधकांची रणनिती ठरणार, आज बैठक

Subscribe

सत्ताधारी भाजपला सत्तेतून खाली खेचण्यासाठी आता सर्व विरोधक एकत्र येत आहेत. आज भाजपविरोधकांची बैठक देखील होत आहे.

सत्ताधारी भाजपला सत्तेतून खाली खेचण्यासाठी आता सर्व विरोधक एकत्र येत आहेत. काहीही करून भाजपला लोकसभा २०१९च्या निवडणुकीमध्ये पराभूत करायचा असा मानस आता विरोधकांनी केला आहे. त्यासाठी भाजपविरोधकांची आज बैठक होणार आहे. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर ही बैठक होत आहे. पाचही राज्यांमध्ये भाजपची पिछेहाट झाल्याचे मतदोनोत्तर चाचणीमधून दिसून आले. त्यामुळे विरोधकांना आणखीनच बळ मिळालं आहे. या बैठकीकरता देशातील प्रमुख पक्षांचे प्रमुख आणि मुख्यमंत्री देखील उपस्थित राहणार आहे. आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबु नायडू यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. यापूर्वी त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची देखील भेट घेतली होती. चंद्रबाबबु नायडू यांनी यापूर्वीच बिगर भाजपशासित राज्यातील मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून या बैठकीसाठी उपस्थित राहण्याची विनंती केली आहे. त्यामुळे आजच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

राफेल करार, सीबीआयमधील वाद, शेतकऱ्यांचे प्रश्न आदी मुद्यांवर सत्ताधारी भाजपला घेरण्याची रणनिती या बैठकीमध्ये ठरण्याची शक्यता आहे. यापूर्वी चंद्रबाबु नायडू आणि ममता बॅनर्जी यांनी सीबीआयला राज्यांमध्ये प्रवेश बंदी केलेली आहे. दरम्यान, या बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी, सपा, बसपा, नॅशनल कॉन्फरन्स, झारखंड मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय लोक समता पार्टी, जनता दल ( सेक्युलर ) डीएमके आणि तृणमुल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींसह इतर देखील प्रमुख नेते हजर राहणार आहेत. त्यामुळे आता भाजपविरोधात सर्व विरोधी पक्ष एकत्र येताना दिसत आहेत. यापूर्वी देखील विरोधकांनी एकत्र येत भाजप मुक्त भारतचा नारा दिलेला आहे. शिवाय, शरद पवार यांनी देखील विरोधकांच्या एकीची गरज व्यक्त केलेली होती. दरम्यान, आजच्या बैठकीनंतर काय होणार? याकडे आता देशाचं लक्ष लागून राहिलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -