घरमहाराष्ट्रधुळे - अहमनगरमध्ये कुणाची सत्ता? थोड्याच वेळात निकाल होणार जाहीर

धुळे – अहमनगरमध्ये कुणाची सत्ता? थोड्याच वेळात निकाल होणार जाहीर

Subscribe

धुळे आणि अहमदनगरमध्ये पालिका निवडणुकांच्या मतमोजणीला थोड्याच वेळात सुरूवात होणार आहे. हमदनगरमध्ये ६८ तर धुळ्यामध्ये ७६ जागांची आज मतमोजणी होणार आहे.

धुळे आणि अहमदनगरमध्ये पालिका निवडणुकांच्या मतमोजणीला थोड्याच वेळात सुरूवात होणार आहे. या पालिकांमध्ये कोणता पक्ष बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. अहमदनगरमध्ये ६८ तर धुळ्यामध्ये ७६ जागांची आज मतमोजणी होणार आहे. त्यामुळे धुळे आणि नगरकरांचा कौल नेमका कुणाला मिळतो हे पाहावं लागणार आहे. धुळे महापालिका निवडणुकांमध्ये भाजप आमदार अनिल गोटे यांना बंडखोरी केली होती. त्यामुळे धुळे मनपाच्या निकालाकडे सर्वांचं विशेष लागून राहिलं आहे. यावेळी धुळेकर अनिल गोटे कि भाजपला साथ देतात? अनिल गोटेंनी केलेल्या बंडखोरीचा फटका नेमका कुणाला आणि फायदा नेमका कुणाला होणार? हे पाहण्यासाठी केवळ काही मिनिटांचा अवधी राहिला आहे. गिरीश महाजनांकडे धुळे मनपाची जबाबदारी दिल्यानं नाराज गोटेंनी थेट बंडाचे निशाण उभे केले होते.

धुळे, अहमदनगरमध्ये मतदान संपलं, मोजणीची प्रतिक्षा!

तर, नगरमध्ये देखील सत्तेच्या चाव्या कुणाकडे जाणार हे पाहावं लागणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या श्रीपाद छिंदमला भाजपनं पक्षातून हाकललं. पण, त्यानंतर देखील श्रीपाद छिंदमनं अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. यावेळी त्यानं घरोघरो जात माफी मागत प्रचार केला. त्यामुळे त्याला देखील आता नगरकर माफ करतात की निवडून देतात हे पाहावं लागणार आहे.

- Advertisement -

दरम्यान, धुळे आणि नगरमध्ये सत्ता कुणाकडे जाणार हे पाहावं लागणार आहे. सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरूवात होणार आहे. धुळे पालिकेमध्ये एक जागा बिनविरोध निवडून आलेली आहे. धुळे आणि नगरच्या निकालावरून जनतेच्या मनात नेमकं कोण आहे हे देखील स्पष्ट होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -