घरCORONA UPDATEजागतिक कोरोना अपडेटयुरोपमध्ये कोरोनामुळे मरण पावलेले ९५ टक्के रुग्ण ६० वयाहून अधिक - WHO

युरोपमध्ये कोरोनामुळे मरण पावलेले ९५ टक्के रुग्ण ६० वयाहून अधिक – WHO

Subscribe

कोरोना व्हायरसचे संक्रमण चीनपासून सुरु झाले होते. मात्र त्याचा सर्वाधिक फटका युरोपला बसला आहे. इटली, फ्रान्स, स्पेन या देशांमध्ये काही हजारोंनी लोक मरण पावली आहेत. यातच आता युरोपमधील जागतिक आरोग्य संघटनेच्या कार्यालयाने एक महत्त्वाची माहती दिली आहे. युरोपमध्ये कोरोना संसर्गामुळे मरण पावलेल्या एकूण रुग्णांपैकी ९५ टक्के रुग्ण हे ६० वर्षांच्या पुढील होते.

डॉ. हंस क्लूज म्हणाले की, जास्त वय असलेल्यांनाच कोरोनाचा धोका आहे असे नाही. तसेच कोविड १९ मुळे केवळ वयोवृद्ध नागरिकच बळी पडत आहे, असे म्हणणे चुकीचे आहे. कोपहेगन येथे गुरुवारी ऑनलाईन कॉन्फरन्समध्ये बोलताना डॉ. हंस म्हणाले की, तरुण लोकही चिरंजीवी नाहीत. इटली, फ्रान्स आणि स्पेनमध्ये आतापर्यंत तब्बल ३० हजार ९८ लोकांचा कोरोनाने बळी घेतलेला आहे.

- Advertisement -

युनायटेड नेशनच्या हेल्थ एजन्सीच्या मतानुसार, ५० हून कमी वय असलेल्या १० ते १५ टक्के लोकांना मध्यम किंवा गंभीर स्वरुपाचे संक्रमण झालेले पाहायला मिळाले. काही प्रकरणात तर लहान मुले आणि विशीतील तरुणांनाही कोरोनाचा संसर्ग झालेला आहे. यातील अनेकांना काळजी घेण्याची गरज असून काही जणांचा दुर्दैवाने मृत्यू झालेला आहे.

डॉ. हंस पुढे म्हणाले की, कोरोनामुळे मृत्यू पावलेले ९५ टक्के लोक साठ वर्षावरील असले तरी त्यातील अर्धे लोक हे ८० हून अधिक वयाचे आहेत. यातील पाच पैकी चार रुग्ण हे आधीपासूनच एखाद्या आजाराने त्रासलेले असतात. काहींना उच्च रक्तदाब, मधुमेह असे आजार होते. मात्र यातही एक सकारात्मक गोष्टी डॉ. हंस यांनी व्यक्त केली ती म्हणजे एक-दोन प्रकरणात १०० हून अधिक वय असलेले रुग्ण कोरोना आजारापासून मुक्त झाले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -