Sunday, January 17, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी होणार स्वस्त? जाणून घ्या आजचे दर

पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी होणार स्वस्त? जाणून घ्या आजचे दर

कोरोना संकट काळात पेट्रोल-डिझेलवर वाढवण्यात आलेल्या उत्पादन शुल्कात ५० टक्क्याने कपात केली तर पेट्रोल दर कमी होतील.

Related Story

- Advertisement -

गेल्या २९ दिवसांपासून इंधन दर स्थिर ठेवणाऱ्या पेट्रोलियम कंपन्यांनी सलग दोन दिवस पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ केली होती. पेट्रोल २६ पैशांनी तर डिझेल २५ पैशांनी वाढले होते. मात्र, आज, शुक्रवारी इंधनाच्या दरात कोणतेही बदल झालेले नाहीत. दरम्यान, सार्वजनिक क्षेत्रातील इंडियन ऑयल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) या तेलकंपन्या जवळपास एक महिन्यानंतर इंधनाच्या किंमतींबाबत आढावा घेत आहेत. त्यामुळे रेकॉर्ड स्तरावर पोहोचलेल्या इंधनाच्या किंमतीपासून सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळू शकतो, अशी शक्यता दिसून येत आहे.

उच्चांकी पेट्रोल-डिझेलच्या दरात दिलासा

पेट्रोलियम मंत्रालयाने उच्चांकी पेट्रोल-डिझेलच्या दरात दिलासा देण्याची शिफारस केली आहे. उत्पादन शुल्क कमी करुन सामान्यांना दिसाला देऊ शकतो, असे मंत्रालयाने म्हटले आहे.

५ रुपयांनी पेट्रोलचे दर कमी होण्याची शक्यता

- Advertisement -

मंत्रालयाच्या मते, कोरोना संकट काळात पेट्रोल-डिझेलवर वाढवण्यात आलेल्या उत्पादन शुल्कात ५० टक्क्याने कपात केली तर पेट्रोल दर कमी होतील. ५० टक्क्याप्रमाणे पेट्रोलचे दर ५ रुपयांपर्यंत प्रति लिटरमागे कमी होऊ शकतात. लॉकडाऊन काळात सरकारने पेट्रोलवर एकरकमी १० रुपये उत्पादन शुल्क वाढविले होते. तसेच, उत्पादन शुल्कात कपात केली गेली तर ग्राहकांना याचा लाभ मिळवून देण्यासाठी राज्यांना देखील सहकार्य करावे लागेल.

तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर कसे पाहाल?

मोबाईलवर एसएमएस पाठवून आपल्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरांची माहिती मिळू शकते. यासाठी मोबाईलवर RSP आणि आपल्या शहराचा कोड लिहून 9224992249 या क्रमांकावर एसएमएस करावा. त्यानंतर तुम्हाला लगेचच पेट्रोल-डिझेलच्या दरांची माहिती देणारा एसएमएस येतो. प्रत्येक शहराचा कोड वेगळा असतो. इंडियन ऑईलच्या (IOC) संकेतस्थळावरून हा कोड तुम्हाला उपलब्ध होईल.

जाणून घ्या आजचे दर

  • दिल्ली- पेट्रोल 84.20 रुपये आणि डिझेल 74.38 रुपये लीटर
  • मुंबई- पेट्रोलचे दर 90.83 रुपये आणि डिझेल 81.07 रुपये लीटर
  • कोलकाता- पेट्रोल 85.68 रुपये आणि डिझेल 77.97 रुपये लीटर
  • चेन्नई- पेट्रोल 86.96 रुपये आणि डिझेल दर 79.72 रुपये लीटर
  • बेंगळुरु- पेट्रोल 87.04 रुपये आणि डिझेल 78.87 रुपये लीटर

- Advertisement -

हेही वाचा – लॉकडाऊन काळात रद्द रेल्वे तिकिटाचा परतावा हवाय ? रेल्वे मंत्रालयाने दिली मुदतवाढ


- Advertisement -