Amazon मध्ये बंपर भरती; महिन्याला ६० हजारांपर्यंत कमावण्याची संधी

recruitment in amazon opportunity to earn up to rs 60,000 per month

लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्याने बेरोजगार झाले आहेत. बेरोजगार लोकांसाठी सुवर्णसंधी चालून आली आहे. ई-कॉमर्स कंपनी Amazon मध्ये नोकरीची संधी आहे. Amazon मध्ये २० हजार जणांची भरती केली जाणार आहे. फुल टाईम, पार्ट टाईम अशा दोन पद्धतीत काम करण्याची संधी Amazon देणार आहे. गरज असल्यास केवळ ४ तास नोकरी करु शकता. Amazon सोबत काम करुन तुम्हाला ६० हजारांपर्यंत कमाई करता येऊ शकते.

Amazon ने डिलिव्हरी बॉयच्या नोकरीची घोषणा केली आहे. डिलिव्हरी बॉयच्या कामातून ५०-६० हजारांपर्यंत कमाई करता येणार आहे. Amazon ने जवळपास सर्वच शहरांमध्ये सेंटर आहेत. त्यामुळे या नोकरीसाठी दुसऱ्या कोणत्याही शहरात जाण्याची गरज लागणार नाही.

डिलिव्हरी बॉय या जॉबसाठी दिवसभर काम करावे लागत नाही. क्षेत्रानुसार पार्सल्सची पॅकेट दिले जाते. डिलिव्हरी बॉयकडून दिलेल्या माहितीनुसार, ४ तासामध्ये जवळपास १०० ते १५० पॅकेट डिलीव्हर केले जातात. डिलिव्हरी बॉयसाठी डिग्री असणे आवश्यक आहे. डिलिव्हरी करण्यासाठी बाईक, स्कूटरची गरज आहे. सोबत बाईक किंवा स्कूटर इंन्शोरन्स, आरसी असायला हवे. अर्ज करणाऱ्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे. डिलिव्हरी बॉयला इतर कंपन्यांप्रमाणेच, दर महिन्याला वेतन दिले जाते. कंपनी आपल्या डिलिव्हरी बॉयला १२ ते १५ हजार रुपये वेतन देते. यात पेट्रोलचा खर्च स्वत: चा असतो. एक प्रोडक्ट किंवा पॅकेट डिलिव्हर केल्यानंतर १५ ते २० रुपये मिळतात. डिलिव्हरी सर्व्हिस देणाऱ्या कंपनीनुसार, जर कोणी संपूर्ण महिनाभर काम केले आणि दररोज १०० पॅकेट डिलिव्हर केले, तर सहजपणे ६० ते ७० हजार रुपये महिना कमाई होऊ शकते.

नोकरीसाठी असा करा अर्ज

डिलिव्हरी बॉयच्या नोकरीसाठी थेट Amazon च्या https://logistics.amazon.in/applynow वेबसाईटवर जाऊन अप्लाय करू शकता. त्याशिवाय Amazon च्या कोणत्याही सेंटरवर जाऊन नोकरीसाठी अर्ज भरु शकता.