घरदेश-विदेशकराची स्टॉक एक्स्चेंज इमारतीवर दहशतवाद्यांचा हल्ला

कराची स्टॉक एक्स्चेंज इमारतीवर दहशतवाद्यांचा हल्ला

Subscribe

पाकिस्तानच्या कराची शहरातील स्टॉक एक्स्चेंजच्या इमारतीवर सोमवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास दहशतवाद्यांनी हल्ला केला. दहशतवाद्यांनी इमारतीत शिरुन अंधाधुंद गोळीबार केला. याशिवाय त्यांनी ग्रेनेड हल्लादेखील केला. या हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाला तर काही लोक गंभीर जखमी झाले आहेत. हल्ला करणारे चारही दहशतवादी ठार झाले आहेत.

विशेष म्हणजे दहशतवाद्यांनी जेव्हा अंधाधुंद गोळीबार सुरू केला तेव्हा इमारतीत जवळपास 300 कर्मचारी होते. या हल्ल्याची माहिती मिळताच कराची पोलीस आणि पाकिस्तान रेंजर्सचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलीस आणि सुरक्षा जवानांनी सुरुवातीला इमारतीत अडकलेल्या सर्व कर्मचार्‍यांना सुखरुप बाहेर काढले. या सर्व कर्मचार्‍यांना इमारतीच्या पाठीमागच्या गेटने बाहेर काढण्यात आले. तर पुढचे मेन गेट सील करण्यात आले.

- Advertisement -

चार दहशतवादी ठार
अतिरेक्यांनी इमारतीच्या मेन गेटवर ग्रेनेड हल्ला केला. पाकिस्तानच्या जवानांनी अतिरेक्यांना तोडीस तोड उत्तर देत इमारतीत प्रवेश केला. त्यानंतर जवानांनी चार अतिरेक्यांना कंठस्नान घातले. यापैकी एका अतिरेक्याचा मेन गेटवरच खात्मा करण्यात आला. तर इतर अतिरेक्यांना स्टॉक एक्स्चेंजच्या इमारतीत मारले.चारही अतिरेकी मारले गेले आहेत. हे सर्व अतिरेकी सिल्वर रंगाच्या गाडीतून आले होते, अशी माहिती कराची पोलीस खात्याचे प्रमुख गुलाम नबी मेमन यांनी दिली आहे. दरम्यान, सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत, अशी माहितीदेखील त्यांनी दिली.

बीएलएने घेतली हल्ल्याची जबाबदारी
बलूचिस्तान लिबरेशन आर्मीने (बीएलए) या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या संघटनेने आपल्या निवेदनात बलूच लिबरेशन आर्मीच्या माजिद ब्रिगेडने कराची स्टॉक एक्स्चेंजवर आज आत्मत्याग केला, असे म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -