घरदेश-विदेशसरकारचे डोळे कधी उघडणार? - प्रियंका गांधी

सरकारचे डोळे कधी उघडणार? – प्रियंका गांधी

Subscribe

प्रियंका गांधी यांनी ट्विटरवर आर्थिक मंदीच्या पार्श्वभूमीवर सरकारवर टीका केली आहे.

देशात आर्थिक मंदीचे सावट आहे. या मंदीमुळे वाहन उद्योगाची अधोगती होत चालली आहे. या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगार कपात होत आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी वाड्रा यांनी सरकारवर टीका केली आहे. याअगोदर माजी पंतप्रधान आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. मनमोहन सिंग यांनी सरकारवर टीका केली होती. देशाची अर्थव्यस्था डगमगत चालली आहे आणि या परिस्थिला जबाबदार सरकार आहे. नोटाबंदी आणि जीएसटीच्या निर्णयामुळे ही परिस्थिती निर्माण झाली, असे सिंग म्हणाले होते. आर्थिक मंदीच्या संकटातून सावरण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेण्याचे आव्हानही सिंग यांनी केले होते. सिंग यांच्यानंतर प्रियंका गांधी वाड्रा यांनी सरकारवर ताशेरे ओढले आहे. आर्थिक मंदीमुळे परिस्थिती अत्यंत भीषण बनली असूनही सरकार याकडे कानाडोळा करत असल्याचे प्रियंका म्हणाल्या आहेत. या संदर्भात त्यांनी ट्विट केले आहे. याशिवाय त्यांनी दोन दिवसांपूर्वी मोदी सरकारच्या कार्यप्रणालीवर टीका करणारी एक कविताही ट्विटरवर शेअर केली आहे.

नेमके काय म्हणाल्या प्रियंका गांधी?

भारतीय अर्थव्यवस्था पूर्णपणे डबघाईला आली आहे. देशात लाखो भारतीयांचा रोजगार संकटात सापडले आहे. ऑटो सेक्टर आणि ट्रक सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. यामुळे देशाचा जीडीपी ग्रोथही कमी होत चालला आहे. मात्र, तरीही सरकार आपले डोळे कधी उघडणार? असे प्रियंका गांधी म्हणाल्या आहेत.

- Advertisement -

प्रियंका यांनी दोन दिवसांपूर्वी देखील ट्विटरवर सरकारवर टीका केली. या टीकेसह त्यांनी एक कविता आणि व्हिडिओ शेअर केला होता.

- Advertisement -


हेही वाचा – हेडलाईन मॅनेजमेंट सोडा, मंदीवर उपाय शोधा – प्रियंका गांधी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -