घरदेश-विदेशहेडलाईन मॅनेजमेंट सोडा, मंदीवर उपाय शोधा - प्रियंका गांधी

हेडलाईन मॅनेजमेंट सोडा, मंदीवर उपाय शोधा – प्रियंका गांधी

Subscribe

प्रियंका गांधी वाड्रा यांनी आर्थिक मंदीवरुन सरकारला सुनावले आहे. सरकारने हेडलाईन मॅनेजमेंट न करता आर्थिक मंदीवर उपाय शोधावे, असे प्रियंका म्हणाल्या आहेत.

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा यांनी मोदी सरकारचे पुन्हा एकदा कान टोचले आहेत. देशात मंदीचे सावट आहे. त्यामुळे या मंदीवर उपाय शोधून त्यासाठी काम करा, अशी कानउघाडणी प्रियंका यांनी केली आहे. प्रियंका यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर यासंदर्भात ट्विट केले आहे. सरकारने आर्थिक मंदी मान्य करायला हवी. शेवटी आर्थिक मंदीचे परिणाम सर्वश्रूत आहेत. त्यामुळे हेडलाईन मॅनेजमेंट करण्यापेक्षा देशातील आर्थिक मंदीचा सामना कसा करावा? यासाठी उपाययोजना सरकारने कराव्यात, असे प्रियंका गांधी म्हणाल्या.

हेही वाचा – राहुल आणि प्रियंका गांधींकडून पी. चिदंबरम यांची पाठराखण

- Advertisement -

नेमके काय म्हणाल्या प्रियंका गांधी?

‘कोणतीही खोटी गोष्ट शंभर वेळा सांगितल्यावर खोटी गोष्ट खरी होत नाही. देशातील अर्थव्यवस्थेवर ऐतिहासिक मंदी आहे, ही बाब भाजप सरकारने मान्य करायला हवी. सरकारने आर्थिक मंदीवर उपाययोजना करायला हव्यात. आर्थिक मंदीचा सामना कसा करायचा? यासाठी उपाययोजना कराव्यात’, असे प्रियंका गांधी वाड्रा म्हणाल्या. त्याचबरोबर आर्थिक मंदीची परिस्थिती सर्वांसमोर आहे. सरकार किती दिवस हेडलाईन मॅनेजमेंट करुन काम चालवेल? असा सवालही त्यांनी केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -