जानेवारीत स्वतःचे प्रॉडक्शन हाऊस लाँच करणार कंगना

जानेवारीत कंगना रनौत तिचं स्वत:च प्रॉडक्शन हाऊस लॉंच करणार. या प्रॉडक्शन हाऊसचा मुख्य हेतू, छोट्या बजेट चित्रपटांना व नव्या कलाकारांना पाठिंबा देणं असणार. तरी कंगना तिनं निर्मीत केलेल्या चित्रपटात अभिनय करणार नाही.

Mumbai
Soon to be producer Kangana Ranaut
लवकरच निर्माती होणार कंगना रनौत

एकटीच हनीमूनला जाणारी ‘क्विन’ मधली राणी, बाळाला घेउन युध्द लढणारी ‘मणिकर्णिका’ मधली राणी लक्ष्मीबाई किंवा ‘फॅशन’ मधली बेदरकार मॉडेल शोनाली… कंगनानं एकापेक्षा एक असा सरस भूमिका साकारल्या आहेत. प्रेक्षकांनी देखील तिच्या कामगिरीला चांगलाच प्रतिसाद दिला. जेव्हा कंगनाचा नवीन चित्रपट येतो, तेव्हा प्रेक्षकांना काहीतरी नवीन पाहण्याची उत्सुकता असते. तिच्या कामगिरीला प्रेक्षक नेहमीच चांगली दाद देतात. तिच्या अभिनयासाठी तिला दोनदा राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला आहे. ही दिग्गज अभिनेत्री आता नव्या भूमिकेकडे वळणार आहे. जानेवारीत तिचं प्रॉडक्शन हाऊस लाँच होणार आहे, असं तिनं नुकतच एका मुलाखतीत सांगितलं.

“जर ‘जजमेंटल है क्या’  माझ्याशिवाय १० कोटींच्या बजेटमध्ये केला गेला असता तर त्याने ४० कोटींची कमाई केली असती. हा चित्रपट ३० कोटींमध्ये केला गेला, मात्र निर्मात्यांचे पैसे त्यातून वसूल झाले नाहीत. मला काही लहान बजेटच्या चित्रपटांना पाठिंबा द्यायचा आहे आणि ते तिकीटबारीवर कसे चालतील, हे  पहायचं आहे. त्यानंतर मी मोठ्या स्तरावर देखील काहीतरी करू शकते. आम्ही डिजिटलच्या दुनियेत देखील काही नवीन आणण्याचा प्रयत्न करणार आहोत.”कंगना  रनौत

स्वत:च्या चित्रपटात काम करणार नाही? 

कंगनाने यावेळी स्पष्ट केलं की, ती निर्माती असलेल्या चित्रपटात कोणतीही भूमिका साकारणार नाही. कारण तिला नवीन कलाकारांना संधी द्यायची आहे. नवीन कलाकारांना तिला मार्गदर्शन द्यायचे आहे. अनेक नवीन कलाकारांना एका चांगल्या प्लॅटफॉर्मची गरज असल्याचे मत कंगनाने व्यक्त केले. काही दमदार स्क्रिप्टस मला मिळाल्या आहेत, ज्या पडद्यावर यायलाच हव्या. प्रकाश कोवेलममुडीचा ‘जजमेंटल है क्या’ मध्ये राजकुमार रावसोबत काम केल्यानंतर आता कंगना अश्विनी अय्यर तिवारी यांच्या ‘पंगा’ आणि रजनीश घई यांच्या अॅक्शन थ्रिलर ‘धाकड’ या चित्रपटात दिसणार आहे.

हे ही वाचा: ‘भूतराजा’ बनून नवाजुद्दीनने केले अक्षयचे बेहाल; ‘या’ गाण्याचे आहे रीक्रिएशन