Video: सलमानची जबरी फॅन; जिची कला पाहून तुम्ही व्हाल थक्क!

Mumbai

बॉलिवूड अभिनेता सलमान खान सोशल मीडियावर आपल्या आयुष्याशी निगडीत अनेक व्हिडिओ आपल्या चाहत्यांबरोबर शेअर करत असतो. यामध्ये आपल्या कामापासून ते चाहत्यांचे त्याच्यावर असणारे प्रेम हे सारं भाईजान सोशल मीडियावर पोस्ट करत असतो.

सलमानची जबरी फॅन

नुकताच सलमानने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एका दिव्यांग फॅनचा व्हिडिओ शेअर केला आहे. या शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये सलमानची जबरदस्त फॅन असणारी मुलगी आपल्या पायांच्या सहाय्याने सलमानचे चित्र रेखाटत आहे. या व्हिडिओला सलमानच्या ‘हॅलो ब्रदर’ या चित्रपटातील ‘तेरी चुनरिया’ हे गाणं ऐकायला येत आहे.

सलमानने आपल्या सोशल मीडियावर अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करताना ‘God bless… can’t reciprocate the love but prayers and much love !!!’ असे कॅप्शन दिले आहे.

सध्या सलमान खान दिग्दर्शक प्रभू देवाचा दबंग ३ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र असून हा चित्रपट डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे. यानंतर सलमान संजय लीला भन्सालीच्या इंशाअल्लाह या चित्रपटात आलिया भट सोबत दिसणार आहे.