आलियाच्या आईने ठाकरे सरकारवर केली टीका; सीमी गरेवाल यांनी दिले सडेतोड उत्तर

Mumbai
soni razdan slams mumbai government for slums in city simi grewal reaction on it tweet
आलियाच्या आईने ठाकरे सरकारवर केली टीका; सीमी गरेवाल यांनी दिले सडेतोड उत्तर

देशातील कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या प्रार्श्वभूमीवर लॉकडाऊन ३१ मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. लॉकडाऊन हा चौथा टप्पा सुरू असून पाचवा टप्प्याबद्दल सध्या चर्चा सुरू आहेत. अशा परिस्थितीत मुंबईत कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर अलीकडेच बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टची आई सोनी राजदान यांनी शिवसेनेच्या सरकारवर ट्विटरच्या माध्यमातून जोरदार निशाणा साधला आहे. पण सोनी राजदान यांच्या ट्विटचे उत्तर अभिनेत्री सीमी गरेवाल यांनी दिलं आहे.

सोनी राजदान यांनी ट्विटमध्ये असं लिहिलं होत की, ‘सर्वाधिक टॅक्स भरणाऱ्या शहरात सर्वात जास्त झोपडपट्टी आहे. तुम्हाला वाटते की, एका वर्षापूर्वी त्यांनी कमी किमतींची घरे बांधली असतील, परंतु नाही. आणि आज आपण इथे आहोत. त्यामुळे या लोभाचा परिणाम नागरिकांना सहन करावा लागत आहे.’

सोनी राजदान यांच्या ट्विटला सीमी गरेवाल यांनी उत्तर असं दिलं की, ‘काही महिन्यांपूर्वी उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे कार्यलयात आले आहेत. त्यांना सर्वात कठीण आव्हानाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे त्यांना थोडा वेळ द्या. तुम्ही पाहा, ते मुंबईसाठी खूप चांगल्या गोष्टी करतील. मला त्याच्या प्रामाणिकपणावर पूर्ण विश्वास आहे तसेच आदित्य ठाकरेंवरही आहे.’ सीमी गरेवाल यांचे ट्विट सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असून त्यांना भरभरून प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.

आतापर्यंत मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा ३५ हजार ४८५ वर पोहोचला आहे. त्यापैकी १ हजार १३५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ८ हजार ६५० जण कोरोनामुक्त झाले आहेत.


हेही वाचा – एकाने सलूनमध्ये सोडण्याची सोनू सूदकडे केली मागणी, त्याने दिले भन्नाट उत्तर