घरलाईफस्टाईलमेथीच्या पाण्याचे आरोग्यदायी फायदे

मेथीच्या पाण्याचे आरोग्यदायी फायदे

Subscribe

मेथीच्या पाण्याचे आरोग्यदायी फायदे.

बऱ्याचदा मेथी ही आरोग्यासाठी उत्तम असल्याचे बोले जाते. त्यामुळे अनेक जण मधुमेह सारखे आजार नियंत्रणात राहण्याकरता मेथीच्या पावडरचे सेवन करतात. मात्र, ज्याप्रमाणे मेथी आरोग्यासाठी लाभदायक आहे. त्याप्रमाणे मेथीचे पाणी देखील आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. चला तर जाणून घेऊया मेथीच्या पाण्याचे आरोग्यदायी फायदे.

असे बनवा मेथीचे पाणी

मेथीचे पाणी बनवण्यासाठी एक ग्लास पाण्यात दोन चमचे मेथी घालून ते पाणी रात्रभर तसेच ठेऊन द्या. सकाळी उठल्यावर त्या पाण्याचे सेवन करा. यामुळे आरोग्यास चांगला फायदा होतो.

- Advertisement -

केसांमधील कोंडा कमी होतो

रोज मेथीच्या पाण्याचे सेवन केल्यास केसांमधील कोंडा कमी होतो. तसेच केस गळण्याचे प्रमाण देखील कमी होते.

वजन कमी होते

एखाद्या व्यक्तीला वजन कमी करायचे असल्यास दररोज रिकाम्या पोटी मेथीच्या पाण्याचे सेवन करावे. यामुळे चांगला फायदा होतो.

- Advertisement -

केस गळणे थांबते

मेथी दाणे रात्रभर नारळाच्या गरम तेलात भिजवून ठेवा. सकाळी या तेलाने डोक्याला मसाज केल्याने केस गळती थांबते.

साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते

रोज मेथीचे पाणी घेतल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते.

मासिक पाळीतील त्रास कमी होतो

स्त्रियानी रोज १ ग्लास मेथीच्या पाण्याचे सेवन केल्याने मासिक पाळीच्या दरम्यान होणाऱ्या पोटदुखीचा त्रास नियंत्रणात ठेवण्यास मदत होते

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -