हिवाळ्यात उत्तम पर्याय ; प्लेड आणि चेक्स

mumbai
कॉर्पोरेट लुक

सकाळी आरशात पाहताच आपली आकर्षक प्रतिमा बघायला कोणाला आवडणार नाही. म्हणूनच कॉर्पोरेट लुकमध्ये आकर्षक दिसण्यासाठी, त्याचप्रमाणे कोणत्याही वेळी स्टाईलिश दिसायला सर्वांना आवडतं. हे कसं शक्य आहे, ह्याचा जर तुम्ही विचार करत असाल तर प्लेड आणि चेक्स हा एक उत्तम पर्याय आहे. कारण तुमच्या रोजच्या पॅण्ट, सूट इत्यादींना ते आकर्षक बनवतात.

चेक्सचे वेगवेगळे पॅटर्न उपलब्ध आहेत. स्कॉटिश प्लेड्सपासून ते गिंगहॅम, फ्लॅनेल मद्रास चेक्ससारखे प्रिंट अगदी उठून दिसतात. असे प्रिंट्स आधीपासून लोकप्रिय आहेत आणि कुठल्याही सीजनमध्ये वापरू शकतो. पारंपरिक जुन्या पद्धतीचे बफेलो चेक्स किंवा सेल्टिक टार्टनपासून आजच्या चेक्सच्या प्रिंटमध्ये खूप बदल आहेत.

हिवाळ्यामध्ये फ्लुएड विस्कोस मटेरियल वापरलेले प्लेड्स छान दिसतात. इनकॉर्पोरेटेड किंवा आवडणार्‍या स्टाईलनुसार सुद्धा प्लेड्स परिधान केले जाऊ शकतात आणि त्याची डिझाईन डोळ्यांना सहज दिसेल असे घटक वापरून केलेली असते. ही एक प्रिंट आहे जी अनेक प्रसंगी वेगवेगळ्या पद्धतीने वापरली जाऊ शकते.

प्लेड्स स्कर्ट, ब्लेझर सेटवर प्लेड किंवा टार्टन शोल्डर ट्रिमिंग, एक चेकर्ड बटण-डाऊन स्वॅप करू शकता आणि तरीही ते खराब दिसणार नाही.

या सीजनमध्ये वॉर्डरोबला अपग्रेड करताना चेक्स आणि प्लेड्सचा वापरून तुम्ही नक्कीच फॅशनेबल दिसू शकता. हे सर्व तुम्हाला किती आरामदायी वाटतं त्याबद्दल आहे. चला तर प्लेड आणि चेक वापरून बघा.

– नेल्सन जाफरी

(लेखक बिर्ला सेल्यूलोजचे डिजाईन हेड आहेत)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here