ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघ – म. क्र. ७३

चंद्रपूर जिल्ह्यात ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघ (विधानसभा क्र. ७३ ) आहे.

Chandrapur
bramhapuri assembly constituency
ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघ - म. क्र. ७३

ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघ चंद्रपूर जिल्ह्यात आहे. हा मतदारसंघ गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात येतो. ब्रम्हपुरी शहर जिल्ह्यात शिक्षणासाठी प्रसिद्ध आहे. २०११च्या जनगननेनुसार ब्रम्हपुरीची लोकसंख्या ही १ लाख ६६ हजार १६५ इतकी आहे.

मतदारसंघ क्रमांक – ७३

मतदारसंघ आरक्षण – खुला

मतदारांची संख्या
पुरुष – १,२९,८४०
महिला – १,२५,५९१
एकूण मतदार – २,५५,४३१

विद्यमान आमदार – विजय वडेट्टीवार, काँग्रेस

mla vijay wadettiwar
विद्यमान आमदार विजय वडेट्टीवार

विजय वडेट्टीवार हे गडचिरोलीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. ते ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. सध्या पक्षाकडून त्यांच्यावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. विजय वडेट्टीवार १९८०च्या दशकापासून राजकारणात सक्रीय आहेत. १९८६ साली ते शिवसेनेचे गडचिरोली जिल्हाप्रमुख बनले. त्यांनी शिवसेनेच्या एकूण ५५० गावात शाखा काढल्या. १९९७ मध्ये त्यांनी गडचिरोली जिल्ह्यात आणि चिमूर भागातील बहुसंख्य ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळवले. २००५ साली त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. १९९८ ते २००४ त्यांची महाराष्ट्र विधानपरिषदेवर निवड झाली. २०१० साली ते जलसंपदा व संसदीय कार्य वित्त व नियोजन आणि ऊर्जा खात्याचे राज्यमंत्री होते. २०१४ साली त्यांची महाराष्ट्र विधानसभेवर फेरनिवड झाली.

विधानसभा निवडणूक २०१४ निकाल

१) विजय वडेट्टीवार, काँग्रेस – ७०,३७३
२) अतुल देशकर, भाजप – ५६,७६३
३) संदिप गड्डमवार, राष्ट्रवादी – ४४,७८७
४) योगराज कृष्णाजी कुटे, मा.क.प. – ७,६३१


हेही वाचा – १२ – गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघ