घरताज्या घडामोडीपुण्यात कोरोनाचा कहर; दिवसभरात १,१६० नव्या रुग्णांची नोंद, १६ जणांचा मृत्यू!

पुण्यात कोरोनाचा कहर; दिवसभरात १,१६० नव्या रुग्णांची नोंद, १६ जणांचा मृत्यू!

Subscribe

पिंपरी-चिंचवड शहरात १ हजार २४ कोरोनाबाधित नवे रुग्ण आढळले असून १० जणांचा मृत्यू झाला आहे.

पुणे शहरातील कोरोना विषाणूचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होताना दिसत आहे. पुण्यात आज दिवसभरात १ हजार १६० कोरोनाबाधित नव्या रुग्णांची वाढ झाली असून १६ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुणे शहरातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ४९ हजार २१७वर पोहोचली असून यापैकी आतापर्यंत १ हजार १८२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच आज दिवसभरात ८९६ रुग्ण बरे होऊ घरी गेले असून आतापर्यंत २९ हजार ४८९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

तसेच आज दिवसभरात पिंपरी-चिंचवड शहरात १ हजार २४ कोरोनाबाधित नवे रुग्ण आढळले असून १० जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आज आढळलेल्या रुग्णांपैकी ग्रामीण भागातील ४३ रुग्ण असून सध्या त्यांच्यावर महापालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत पिंपरी-चिंचवड शहरात १७ हजार २६४ कोरोनाबाधित आढळले असून यापैकी ११ हजार ४३० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आज दिवसभरात शहरात ६९९ रुग्ण बरे होऊन त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच सध्या ३ हजार ४५१ जणांवर उपचार सुरू आहे, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे.

- Advertisement -

दरम्यान आज राज्यात ७ हजार ९२४ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून २२७ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा लाख ८३ हजार ७२३वर पोहोचला असून यापैकी आतापर्यंत १३ हजार ८८३ जणांचा मृत्यू झाला आहे.


हेही वाचा – Corona Update: मुंबईत दिवसभरात १,०३३ नव्या कोरोनाबाधितांची नोंद!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -