घरदेश-विदेशनगर पंचायतीच्या अध्यक्षांची गाढवावरून मिरवणूक; कारण वाचून व्हाल थक्क...

नगर पंचायतीच्या अध्यक्षांची गाढवावरून मिरवणूक; कारण वाचून व्हाल थक्क…

Subscribe

लग्नामध्ये घोड्यावर बसून नवरदेवाची मिरवणूक काढण्याची प्रथा सर्वांनाच ज्ञात आहे. मात्र सोमवारी मध्यप्रदेश मधील इंदूर येथे नवरदेवासारखं सजवून एका व्यक्तीची चक्क गाढवावरून मिरवणूक काढण्यात आली. याचं कारण वाचून तुम्ही थक्क व्हाल. शिवाय, विशेष म्हणजे ही कोणा ऐऱ्या-गैऱ्याची मिरवणूक नव्हती तर नगर पंचायतीचा अध्यक्ष याची मिरवणूक काढण्यात आली होती. याबाबतचं वृत्त लाइव्ह हिंदुस्तान या वृत्तसंस्थेने दिलं आहे

ढोल-ताशे आणि तरुणांच्या गराड्यात मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक पाहून रस्त्यावरून जाणारा-येणारा प्रत्येक जण अवाक् होत होता. सजून-धजून गाढवावर बसलेला नवरदेव, ढोल-ताशांचा गजर आणि वऱ्हाडी असा लवाजमा रस्त्यावरून निघाला. पण घोड्याऐवजी गाढवावर बसलेला नवरदेव पाहून प्रत्येकाच्या मनात असा प्रश्न निर्माण झाला. ‘लाईव्ह हिंदुस्थान’ने दिलेल्या वृत्तानुसार, ही मिरवणूक इंदूरजवळील ग्रामीण भागात काढण्यात आली आणि गाढवावर बसलेला व्यक्ती नगर पंचायतीचा अध्यक्ष शिवा डींगु होता. भर पावसाळ्यात इंदूर आणि परिसरात पावसाने पाठ फिरवल्याने त्यांएक प्रथा म्हणून त्यांनी ही मिरवणूक काढली.

- Advertisement -

जुन्या रुढीनुसार गावात पाऊस पडत नाही तेव्हा गावचा प्रमुख व्यक्तीची गाढवावर बसवून मिरवणूक काढण्यात येते. नवरदेवासारखे सजून, ढोल-ताशांच्या गजरात गाढवावर बसून मिरवणूक काढल्याने आणि स्मशानात मीठ व कापूस जाळल्याने वरून देवाची कृपा होते, अशई समज या लोकांची आहे. शिवाय, याआधी देखील असं करण्यात आलं होतं आणि त्याचा परिणाम चांगला झाला होता व पाऊसही चांगला पडला, असं तिथले लोक सांगतात.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -