Corona Live Update: गेल्या २४ तासांत मुंबईत ९०३ नवे कोरोना रुग्ण!

New Delhi
corona live update
कोरोना व्हायरस लाईव्ह अपडेट

मुंबईत गेल्या २४ तासांत ९०३ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ३६ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा ७७ हजार १९७वर पोहोचला असून ४ हजार ५५४ झाला आहे. तसेच २४ तासांत ६२५ रुग्ण बरे झाले असून राज्यात आतापर्यंत ४४ हजार १७० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.


राज्यात आज ४ हजार ८७८ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून २४५ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा १ लाख ७४ हजार ७६१वर पोहोचला असून मृतांचा आकडा ७ हजार ८५५ झाला आहे.


धारावीत आज कोरोनाचे ६ नवे कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे धारावीतील कोरोनाबाधितांचा आकडा २ हजार २६८वर पोहोचला आहे, अशी माहिती महापालिकेने दिली आहे.


तामिळनाडूमध्ये आज ३ हजार ९४३ नवे कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून ६० जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे तामिळनाडूतील कोरोनाबाधितांचा आकडा ९० हजार १६७वर पोहोचला असून १ हजार २०१ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच सध्या ३८ हजार ८८९ जणांचा उपचार सुरू आहेत. तर ५० हजार ७४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती तामिळनाडू आरोग्य विभागाने दिली आहे.


प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनांचा विस्तार दिवाळी आणि छटपूजेपर्यंत म्हणजे नोव्हेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत केला जाईल. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेच्या विस्तारासाठी ९० हजार कोटींपेक्षा जास्त खर्च झाला आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. सविस्तर वृत्त


२४ तासांत ८३३ रुग्णांची नोंद

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा कहर दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. मुबंई शहरातील वाढत्या कोरोना रूग्णांच्या आकडेवारी बरोबरच पुण्यात देखील कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. दरम्यान, कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून २४ तासांत ८३३ रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या २१ हजार ६९० वर गेली आहे. तर १२ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे तर दुसरीकडे ४८२ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे स्थानिक प्रशासनाची चिंता अधिक वाढली आहे. शहरात सलग दोन दिवस पाचशे पेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळल्याने पुणेकरांची चिंता अधिक वाढली आहे. (सविस्तर वाचा)


केंद्र शासनाची वेगवेगळी कार्यालये/आस्थापना, उच्च न्यायालये आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकामधील कर्मचाऱ्यांना लोकलने प्रवास करण्याची परवनागी देण्यात यावी,अशी विनंती राज्यशासनाने रेल्वेला केली आहे.याविषयीचा अंतिम निर्णय रेल्वेमार्फत घेतला जाईल. केंद्र शासनाच्या कार्यालयांमध्ये आयकर विभाग, मुंबई पोर्ट ट्रस्ट, कस्टम(जकात) आणि संरक्षण(डिफेन्स) विभागाचा समावेश आहे.

कार्यालयीन वेळांमधील बदलांच्या अटी आणि शर्तींसह लोकलने प्रवासाची परवानगी राहील. लोकल प्रवासासाठी परवानगी देण्यात आलेली कार्यालये /आस्थापना यांच्या कार्यालय प्रमुखांनी आवश्यकता असलेल्या कर्मचाऱ्यांना पासेस देणे आवश्यक आहे. राज्य शासनाने या आधी केंद्र शासनाच्या कार्यालयांच्या उपस्थिती संदर्भात ज्या अटी घातल्या होत्या त्याचे पालन करणे बंधनकारक राहील. त्याशिवाय सामाजिक अंतर(सोशल डिस्टन्सिंग), मास्क, सॅनिटायझेशन या सारख्या बाबींचे पालन करणे आवश्यक आहे.


अभिनेता आमीर खानच्या काही कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांना तातडीने क्वॉरन्टाईन केलं असून बीएमसीने तातडीने वैद्यकीय मदत केली, अशी माहिती आमीरने ट्विटरवर दिली आहे. (सविस्तर वाचा)


चोवीस तासांत सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) आणखी ५३ जण करोनाबाधित असल्याचे आढळले आहेत. तर चार जणांनी करोनावर मात केली आहे. सध्या उपचार सुरू असलेल्यांची एकूण संख्या ३५४ झाली आहे. आतापर्यंत ६५९ जणांनी करोनावर मात केली असल्याची माहिती, बीएसएफकडून देण्यात आली आहे.


देशात पुन्हा एकदा सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. मागील २४ तासांत देशात १८ हजार ५२२ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची संख्या ५ लाख ६६ हजार ८४० वर पोहोचली असून २ लाख १५ हजार १२५ अॅक्टिव्ह केसेस आहेत. तर आतापर्यंत १६ हजार ८९३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी संध्याकाळी देशाला संबोधित करणार आहेत. पंतप्रधान मोदी ३० जून रोजी संध्याकाळी ४ वाजता देशाला संबोधित करतील. एकीकडे कोरोना विषाणूची आकडेवारी वेगाने वाढत आहे, दुसरीकडे, गलवाना खोऱ्यातील हिंसक संघर्षानंतर भारत-चीनमध्ये तणाव कायम आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधान मोदी आज जे भाषण करणार ते अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here