घरमहाराष्ट्रखडसे आमच्या संपर्कात शरद पवारांचा गौप्यस्फोट

खडसे आमच्या संपर्कात शरद पवारांचा गौप्यस्फोट

Subscribe

भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यासह राज्य सरकारमधील अनेक नाराज नेते राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी ठाण्यात केला. त्यामुळे भाजपमध्ये मोठा अपमान झालेले खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. जनतेच्या समस्यांची उत्तरे नसल्याने सत्ताधार्‍यांकडून भावनिक मुद्द्यांना हात घातला जात आहे, अशी टीकाही यावेळी पवारांनी भाजप-शिवसेनेवर केली.

ठाण्यात आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्ता मेळाव्यानंतर पवारांनी पत्रकार परिषद घेत सरकारवर निशाणा साधला. यावेळी बिहारचे युवा नेते कन्हैया कुमार हजर होते. आव्हाड यांच्या मेळाव्यासाठी स्वतः शरद पवार आल्याने राष्ट्रवादीत आव्हाड यांचे वजन वाढल्याचे चित्र प्रकर्षाने दिसून आले. पत्रकार परिषदेत पवार यांचा उत्साह बघता सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेसमोर ते मोठे आव्हान उभे करतील, असेही त्यांच्या बोलण्यातून समोर आले आहे.

- Advertisement -

खडसे मागील तीन महिन्यांपासून संपर्कात आहेत. मात्र त्यांचे पक्षात येण्याबाबत अद्याप निश्चित सांगता येत नाही. ते काय पर्याय शोधतील हे आत्ताच काही सांगता येत नाही. पर्याय हा लगेच तयार होत नसतो. पवारांच्या या वक्तव्याने खळबळ उडाली आहे.

खडसेंचा मात्र इन्कार
पवार यांनी खडसे आपल्या संपर्कात असल्याचा दावा केल्यानंतर मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसे यांनी आपल्या नाराज कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात साफ इन्कार केला. ’तीन महिनेच काय तीन वर्षांपासून मी राष्ट्रवादीच्या संपर्कात नाही. कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र आहेत, मात्र आपण पवारांशी संपर्कात नाही,’ असे खडसे म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -