घरमहाराष्ट्रदुष्काळावर उपाययोजना करा; अन्यथा मनसे आंदोलन छेडणार

दुष्काळावर उपाययोजना करा; अन्यथा मनसे आंदोलन छेडणार

Subscribe

आता मनसेने देखील दुष्काळाच्या मुद्द्यावर सरकारला जाब विचारणार केली असून येत्या आठ दिवसांमध्ये निर्णय घ्यावा, अन्यथा मनसे राज्यभरात रौद्र स्वरूपात आंदोलन छेडणार असल्याचा इशारा मनसेने सरकारला दिला आहे.

सध्या राज्यात भिषण दुष्काळ असून, सर्वच पक्ष आता दुष्काळासाठी शेतकऱ्यांच्या बाजूने उतरल्याचे पहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, कॉंग्रेसनंतर आता मनसेने देखील दुष्काळाच्या मुद्द्यावर सरकारला जाब विचारणार आहे. सोमवारी मनसेचे शिष्टमंडळाने महाराष्ट्रात सुरु असलेल्या दुष्काळासंदर्भात महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. या दरम्यान, चंद्रकांत पाटील यांना मनसेच्या शिष्टमंडळाने निवेदन देऊन काय उपाययोजना केल्यात याचे सरकारने योग्य उत्तर द्यावे, अन्यथा मनसे या विषयावर रान उठवेल आणि मनसेचे रौद्ररूप पहायला मिळेल, असा इशारा मनसे नेते जयप्रकाश बाविस्कर यांनी दिला आहे.

याविषयी उत्तरे द्या

महाराष्ट्रात ३१ ऑक्टोबर २०१८ पासून दुष्काळ जाहीर केला आहे. तेव्हापासून मनसेचे कार्यकर्ते दुष्काळावर अभ्यास करत आहेत. ‘राज्यातील सर्व तालुक्यांमध्ये अधिकाऱ्यांना उपाययोजना करण्यासाठी आम्ही पाठपुरावा केला आहे. आज आम्ही तसेच चारा छावण्या, पाण्याचे टँकर आणि रोजगार कुठे दिले याचे देखील उत्तर द्यावे, अशी मागणी करत या सर्व बाबींवर सरकारने आठ दिवसांमध्ये निर्णय घ्यावा, अन्यथा मनसे राज्यभरात रौद्र स्वरूपात आंदोलन छेडेल, असे त्यांनी सांगितले. तसेच शेतकरी जगाला निवडणूका इतक्या महत्वाच्या नाहीत, असे सांगत त्यांनी सरकारला इशारा दिला आहे.

- Advertisement -

वाचा – एक्झिट पोलचे उलटेच अंदाज! राज ठाकरेंच्या सभांचा नक्की फटका कुणाला?


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -