Tuesday, January 12, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र धावत्या बसला आग, चालकाच्या सतर्कतेमुळे टळळा अनर्थ

धावत्या बसला आग, चालकाच्या सतर्कतेमुळे टळळा अनर्थ

नाशिक-मुंबई महामार्गावरील विल्होळी गावाजवळील दुर्घटना

Related Story

- Advertisement -

मुंबईहून नाशिकच्या दिशेने येणाऱ्या खासगी बसने अचानक पेट घेतला. हळूहळू संपुर्ण बसला आगीने वेढल्याने बस पूर्णतः जळून खाक झाली. चालकाच्या सतर्कतेने या घटनेत मोठा अनर्थ टळला.

नाशिक-मुंबई महामार्गावरील विल्होळी गावाजवळ आज दुपारी ४ वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या माहितुनसार, या आगेच्या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून चालकाच्या प्रसंग अवधानाने मोठा अनर्थ टळला. या बसने ज्या ठिकाणी पेट घेतला त्या ठिकाणांहून अवघ्या काही अंतरावर पेट्रोल पंप असल्याने महार्गावर काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. याशिवाय ज्या हॉटेल बाहेर ही बस पेटली त्या हॉटेल बाहेर इतर वेळी गॅस आणि पेट्रोल टँकर देखील विश्रांतीसाठी उभे असतात. मात्र सुदैवाने आज घटना घडली तेव्हा या ठिकाणी गॅस आणि पेट्रोल डिझेलचे टँकर उभे नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

- Advertisement -