घरताज्या घडामोडीCoronavirus: पनवेलमध्ये नागरिकांचा जीव धोक्यात टाकून दुकाने उघडीच!

Coronavirus: पनवेलमध्ये नागरिकांचा जीव धोक्यात टाकून दुकाने उघडीच!

Subscribe

पनवेलमधील दुकानदारांकडून सरकारी आदेश धाब्यावर!

करोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध प्रकारची पावले उचलण्यात येत आहेत. या उपाय योजनांचाच एक भाग म्हणून अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने आणि व्यवसाय बंद ठेवण्याचा निर्णय शासनाच्यावतीने घेण्यात आला होता. याच निर्णयाची अंमलबजावणी पनवेल पालिका क्षेत्रात देखील केली जात असून, कालपासून पालिका हद्दीतील अत्यावश्यक सेवा देणारे व्यवसाय सुरु ठेवण्याच्या व इतर व्यवसाय बंद ठेवण्याचे निर्देश पालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी दिले होते. नागरिकांनी या निर्णयाला साथ दिल्याने पालिका हद्दीतील बरेच रस्ते निर्मनुष्य झाल्याचे पाहायला मिळाले असले तरी शुक्रवारी दुपारपर्यंत अनेक व्यावसाईक छुप्या मार्गाने आपले व्यवसाय सुरु ठेऊन नियमांचे धिंडवडे उडवत असल्याचे पाहायला मिळाले.


हेही वाचा – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सीएसएमटी रेल्वे स्थानकाची केली पाहणी

- Advertisement -

प्रशासनाच्या सूचनांनंतरही अनेक भागात चोरी छुप्या पद्धतीने पानाच्या गाद्या सुरु असल्याचे पाहायला मिळाले. दुकाने बंद ठेऊन काही विक्रेते लहान लहान बॅगेमधून सिगरेट तसेच तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करत होते. शहरातील अनेक मिठाईच्या दुकानात मिठाई सोबत इतर खाद्य पदार्थ विक्री केली जात असल्याने सकाळी ११ वाजेपर्यंत मिठाईच्या दुकानांमध्ये खाद्य पदार्थ खरेदी साठी ग्राहकांची मोठी गर्दी झाली होती. अत्यावशक सेवा सुरु राहणार असल्याचे निर्देश शासनाकडून वारंवार देण्यात येत असून देखील अनेक नागरिक डी मार्ट, रिलायन्स फ्रेश तसेच इतर शॉपिंग मॉलमध्ये प्रचंड गर्दी करत असल्याने पालिका अधिकाऱ्यांना मॉल मध्ये जाऊन व्यवस्थापनाला गर्दी नियंत्रणात आणायचे निर्देश द्यावे लागत होते.

दुपारपर्यंत अनेक भागात दुकाने उघडी असल्याचे निदर्शनास आल्याने पालिकेचे कर्मचारी स्वतः सर्वत्र फिरून दुकाने बंद करण्याचे निर्देश देताना दिसत होते. सुट्टी मिळाल्याने अनेकजणांनी घरात बसने पसंत केल्याने मुंब्रा, पनवेल, शिव, मुबंई पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक निम्याने कमी झाल्याने अनेक रस्ते सुनसान झाले होते.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -