प्रेमवीराविरुध्द शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

एकतर्फी प्रेमातून तरुणाने अल्पवयीन मुलीकडे शरीर संबधांची मागणी केली. भावनात्मक करून मुलीला पळवण्याचा प्रयत्न केल्यामुळे तरुणाविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला.

Mumbai
two groups disputes durng gramsabha
ग्रामसभे दरम्यान दोन गटात हाणामारी

अल्पवयीन मुलीची छेड काढून दमदाटीने शारीर संबधांची मागणी करणाऱ्या प्रेमवीराविरुध्द शाहूपुरी पोलीस ठाण्यात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष चव्हाण असे युवकाचे नाव असून एकतर्फी प्रेमातून त्याने हा प्रकार केला. मुलीला घाबरवण्यासाठी त्याने स्वत: ला भाजून घेतल्याची अफवा पसरवली होती. अफवा पसरवून त्याने पीडित मुलीला तिच्या शाळा परिरातून पळवले. पीडितमुलगी अल्पवयीन असल्यामुळे पाक्सोअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

अशी घडली घटना

याप्रकरणी १६ वर्षीय मुलीच्या आईने पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संशयित संतोष चव्हाण हा गेल्या दोन महिन्यांपासून तक्रारदाराच्या घरासमोरुन घिरट्या घालत होता. तक्रारदार यांच्या अल्पवयीन मुलीची ओळख वाढवून तिला भेटण्यासाठी तो प्रयत्न करत होता. या कालावधीतच संशयिताने अल्पवयीन मुलीला तिच्या शाळेच्या परिसरात गाठले. तेथे संशयिताने ‘मी तुझ्यासाठी भाजून घेतले आहे,’ असे मुलीला सांगून त्याने भावनिक केले. या सर्व घडामोडीनंतर मुलीने त्या युवकाला बजावले. मात्र तरीही संशयित युवक मुलीचा पाठलग करुन दमदाटी करु लागला.
अखेर मुलीने घरी सांगितल्यानंतर मंगळवारी सायंकाळी शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुध्द पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here