वडिलांनीच केली मुलाची हत्या? जोगेश्वरी पोलिसांचा तपास सुरू

मुलाच्या अनैतिक संबंधांना कंटाळलेल्या पित्याने मुलाची हत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Mumbai
Father killed son?
वडिलांनीच केली मुलाची हत्या?

जोगेश्वरीत ३३ वर्षीय तरुणाची सोमवारी सायंकाळी अज्ञात मारेकर्‍याने बंदूकीने गोळी झाडून हत्या केल्याची घटना घडली. या घटनेत विकी श्रीनिवास गांजी या तरूणाचा मृत्यू झाला. या याप्रकरणी ओशिवरा पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदविला असून याच गुन्ह्यात मृत विकीचे वडील श्रीनिवास गांजी याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. अनैतिक संबंधाला विकीचा असलेल्या विरोधाच्या सूडापोटी त्याने ही हत्या केल्याचा पोलिसांचा संशय आहे. श्रीनिवासची चौकशी सुरु असून त्याला अद्याप या गुन्ह्यात अटक झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. रॉकी गांजी हा जोगेश्वरीतील ओशिवरा, नर्मदा सोसायटीच्या रुम नं. ३११ मध्ये त्याचे वडिल श्रीनिवास आणि मोठा भाऊ रॉकीसोबत राहतो. सध्या रॉकी हा गोरेगाव येथील के लाऊन्जमध्ये सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून कामाला तर त्याचे वडील चालक म्हणून कामाला आहेत. विकी हा पदवीधर असून गेल्या दीड वर्षांपासून बेरोजगार आहे. तो काहीच कामधंदा करीत नव्हता. त्याची आई नॅटी ही सांताक्रुज येथे वेगळी राहते.

…म्हणून वडीलांची चौकशी

सोमवारी सकाळी ११ वाजता रॉकी हा नेहमीप्रमाणे कामाला निघून गेला. रात्री त्याला त्याचा भाऊ विकी याची हत्या झाल्याचे समजले. त्याच्या छातीच्या डाव्या बाजूला पिस्तूलने गोळी झाडल्याची जखम होती. त्याला कूपर हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्याच्या तक्रारीनंतर ओशिवरा पोलिसांनी अज्ञात मारेकर्‍याविरुद्ध हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला. या गुन्ह्याचा तपास सुरु असताना पोलिसांनी श्रीनिवास गांजी याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. विकीला मृत अवस्थेत सर्वप्रथम त्यांनीच पाहिले होते. त्यानंतर त्याने स्थानिक रहिवाशांच्या मदतीने ओशिवरा पोलिसांना ही माहिती दिली होती. घरासह इमारतीची तपासणी केल्यानंतर श्रीनिवासच्या स्कूटरमध्ये पोलिसांना एक बंदूक सापडली. याच बंदूकीतून विक्रीवर गोळी झाडण्यात आली असावी असा पोलिसांचा अंदाज आहे. या घटनेनंतर श्रीनिवासला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.

हेही वाचा – भिवंडीत अल्पवयीन मुलीवर मित्राचा अत्याचार

अनैतिक संबंधांमुळे हत्या केल्याचा संशय

सोमवारी रात्री उशिरा तसेच मंगळवारी दिवसभर त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु होती. या चौकशीचा तपशील समजू शकला नाही. मात्र त्यानेच त्याचा मुलगा विकी याची हत्या केल्याचा पोलिसांचा संशय आहे. प्राथमिक तपासात विकी आणि श्रीनिवास यांच्यात पटत नव्हते. विकी हा विवाहीत असून त्याची पत्नी त्याला सोडून गेली होती. नंतर या दोघांनी घटस्फोट घेतला होता. श्रीनिवास याचे काही महिलांशी अनैतिक संबंध होते. या संबंधांमुळे त्याची पत्नी त्याला सोडून गेली होती. पत्नी गेल्यानंतर तो एका महिलेला नेहमीच घरी आणत होता. त्यावरुन त्यांच्यात खटके उडत होते. इतकेच नव्हे तर या दोघांनी एकमेकांविरुद्ध ओशिवरा पोलीस ठाण्यात अनेकदा अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद केली आहे. अनैतिक संबंधाला विरोध केल्यामुळे श्रीनिवासने त्याचा मुलगा विकी याची हत्या केली का? याचा आता पोलीस तपास करीत आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here