Friday, June 25, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर मुंबई राज्यात रोटा व्हायरसची लस सुरू

राज्यात रोटा व्हायरसची लस सुरू

मुंबई शहर उपनगरातील एक वर्षांखालील मुलांना दरवर्षी रोटा व्हायरस ही लस मोफत देण्यात येणार आहे.

Related Story

- Advertisement -

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यात रोटा व्हायरस लसीचा नियमित लसीकरण कार्यक्रमात समावेश करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने मुंबई महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यांतर्गत सर्व लसीकरण केंद्रात रोटा व्हायरस लसीचा नियमित कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. सध्या राज्याला ४ लाख ४० हजार लसींचे डोस आणि त्यासाठी लागणारे साहित्य पुरवण्यात आले आहे. मुंबई शहर उपनगरातील एक वर्षांखालील मुलांना दरवर्षी ही लस मोफत देण्यात येणार आहे. रोटा व्हायरस लस ही तोंडावाटे दिली जाणारी लस असून जन्माच्या ६, १०व्या आणि १४ व्या आठवड्यात अन्य लसींसोबत दिली जाणार आहे. अतिसारामुळे होणाऱ्या बालकांमध्ये मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी रोटा व्हायरस प्रतिबंध करणे हा प्रभावी पर्याय आहे.

हेही वाचा – राज्यात तंबाखूजन्य पदार्थ विक्रेत्यांवर कारवाई

४० टक्के बालकं रोटा व्हायरसने ग्रस्त

देशात अतिसारामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल होणाऱ्या मुलांमध्ये अंदाजे ४० टक्के बालकं रोटा व्हायरस ग्रस्त असल्याचे निदर्शनास आले आहे. देशासह जगातील ९३ देशात राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमात ही लस अंतर्भूत करण्यात आली आहे. मुंबईत शहर उपनगरातील आरोग्य केंद्र, दवाखाने, प्रसुतीगृह आणि हॉस्पिटमलध्ये ही लस उपलब्ध असून प्रशिक्षित कर्मचारी यांना लसीकरण कार्यक्रमासाठी प्रशिक्षित करण्यात आले आहे.

लहान बालकांना रोटा व्हायरसमुळे जुलाब होण्याचे प्रमाण ३० ते ४० टक्के आहे. अतिसार झाल्याने लहान मुलांना डिहायड्रेशन होण्याची शक्यता असते. त्यामुळे हॉस्पिटसमध्ये दाखल करून त्यांना सलाइनद्वारे आवश्यक घटक देण्याची वेळ येते. त्यामुळे बालके दगावू शकतात. आता पूर्वीपेक्षा बालकांचे दगावण्याचे प्रमाण कमी झाले आहे. नियमित लसीकरणांतर्गत ही लस देण्यात येणार आहे.
डॉ.पद्मजा केसकर, कार्यकारी आरोग्य अधिकारी, पालिका सार्वजनिक आरोग्य विभाग

- Advertisement -