घरमुंबईकोपर पुलावरील वाहतूक रविवारपासून बंद!

कोपर पुलावरील वाहतूक रविवारपासून बंद!

Subscribe

रेल्वे प्रशासनाने केडीएमसीला कोपर पूल बंद करण्याची नोटीस बजावल्यानंतर शुक्रवारी केडीएमसीने पुलावरील वाहतूक बंद करण्याची सूचना वाहतूक विभागाला केली होती.

डोंबिवली पूर्व व पश्चिमेला जोडणारा कोपर पूल रविवार १५ सप्टेंबरपासून संध्याकाळी ६ नंतर बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे वाहन चालकांनी ठाकुर्ली उड्डाणपूलाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे एसीपी डी. बी. निघोट यांनी केले आहे. रेल्वे प्रशासनाने केडीएमसीला कोपर पूल बंद करण्याची नोटीस बजावल्यानंतर शुक्रवारी केडीएमसीने पुलावरील वाहतूक बंद करण्याची सूचना वाहतूक विभागाला केली होती.

हेही वाचा – रस्ते दुरूस्तींची बिले भांडवली खर्चातून न काढण्याच्या आयुक्तांचा आदेश

नागरिकांना वाहतुक कोंडीचा सामना करावा लागणार

वाहतुकीच्या दृष्टीने कमकुवत झाल्याने कोपर पूल २८ ऑगस्टपासून बंद करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला होता. मात्र हा पूल बंद झाल्यास शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीला नागरिकांना सामोरे जावे लागणार असल्याने लोकप्रतिनिधींनी विरोध दर्शविला होता. मात्र त्यानंतर पुलावरील अवजड वाहनांवरील वाहतूक बंद करण्यात आली होती. रविवारपासून हा पूल वाहतुकीसाठी बंद केला जाणार आहे. डोंबिवली पूर्व व पश्चिमेला जाण्यासाठी ठाकुर्ली रेल्वे उड्डाणपूल आहे. मात्र हा मार्ग चिंचोळा असल्याने या पुलावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊन त्याचा सामना नागरिकांना करावा लागणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -