घरदेश-विदेशमोठी घोषणा! ४५ लाखांपर्यंत घर खरेदी केल्यास टॅक्सवर सूट

मोठी घोषणा! ४५ लाखांपर्यंत घर खरेदी केल्यास टॅक्सवर सूट

Subscribe

आर्थिक मंदीच्या संकटाशी सामना करण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत.

प्रत्येक सर्वसामान्य व्यक्तीचे आपले हक्काचे एक घर असावे, असे स्वप्न असते. याच स्वप्नाला वास्तव्यात साकारण्यासाठी अनेक जण कर्ज घेतात. यासोबतच घर खरेदी केल्यावर अनेक टॅक्स देखील त्या व्यक्तीला भरावे लागतात. मात्र, सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ४५ लाख रुपयांपर्यंत घर खरेदी केल्यास घरे खरेदी करणाऱ्या सर्वसामान्य व्यक्तीला आता टॅक्सवर सूट मिळणार आहे. देशाचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यासंदर्भात महत्त्वपूर्ण घोषणा केली. आर्थिक मंदीच्या सावटाखाली झुंजणाऱ्या भारतीय अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी सीतारामन यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. शनिवारी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भात घोषणा केली.

निर्यात आणि रिअल इस्टेटसंदर्भात महत्त्वाच्या घोषणा

देशभरात सध्या आर्थिक मंदीचे सावट आहे. शेअर मार्केट, सेन्सेक्सचा प्रगतीचा आलेख खाली घसरला आहे. त्यामुळे दिवसेंदिवस आर्थिक मंदीचे पडसाद आणखी गडद पडण्याची दाट शक्यता अर्थतज्ज्ञांकडून वर्तवण्यात आली आहे. आर्थिक मंदीवरुन विरोधकांनी देखील मोदी सरकारवर निशाना साधला आहे. त्यामुळे मोदी सरकार या संकटापासून देशाची सुटका कशी करणार? याकडे सर्वांचे लक्ष आहे. दरम्यान, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दुपारी आर्थिक मंदीच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीतील नॅशनल मीडिया सेंटरमध्ये पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत सीतारामन यांनी निर्यात आणि रिअल इस्टेटसंदर्भात महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. यामध्ये छोट्या करदात्यांना महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. छोट्या डिफॉल्टमध्ये आता फौजदारी गुन्हा दाखल होणार नाही. याशिवाय २५ लाखांपर्यंत टॅक्स डिफॉल्टर्सवर कारवाई करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची मंजूरी घेणे जरुरीचे आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -