केईएम हॉस्पिटलमधील डॉक्टरांना शिवीगाळप्रकरणी सडेतोड उत्तर

काही दिवसांपू्र्वी केईएम हॉस्पिटलमध्ये एका कोरोना रुग्णाला मृत घोषित करण्यात आले होते. मात्र त्यांच्या कुटुंबियांनी जो जीवंत असल्याचा दावा करत हॉस्पिटलमध्ये गोंधळ घातला होता. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामध्ये रुग्णाच्या नातलगांनी तेथील महिला डॉक्टरला शिवीगाळ करत प्रक्षोभक भाषेचा वापर केला होता. त्याला उत्तर देणारा हा व्हिडिओ आता समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये डॉक्टरांची सद्यस्थिती मांडली असून त्या गोंधळ घालणाऱ्यांना अटक करण्याची मागणी या इसमाने केली आहे. कौशल पटेल असे या डॉक्टर, टेक्निशिअनचे नाव असून त्यांच्या फेसबुक पेजवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.