महाविकासआघाडीची चंद्रकांत पाटील यांनी उडवली खिल्ली

Mumbai

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सरकारची खिल्ली उडवली आहे. ही महाविकास आघाडी नसून महाभकास आघाडी आहे. आम्ही सत्तेत नसलो तरी अनेक जिल्हा परिषद आणि महापालिकामध्ये सत्ता स्थापन केली आहे. त्यामुळे त्याचा परिणाम आमच्यावर काही झाला नाही. आम्ही २४ तास काम करत आहोत, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा महाविकासआघाडीवर टिकास्त्र सोडलंय.