देशातला पहिला प्रयोग – फ्लॉवर पार्क!

Mumbai

गुलशनाबाद म्हणून एकेकाळी ओळख असलेल्या नाशिकमध्ये नवीन वर्षापासून रंगीबेरंगी फुलांचा महोत्सव भरला आहे. इथं येणार्‍या प्रत्येकाला सेल्फी काढण्याचा मोह व्हावा, असा हा उत्सव आहे. केवळ महाराष्ट्रातीलच नाही तर देश आणि विदेशातील पर्यटक फुलांचा आनंद लुटण्यासाठी इथे गर्दी करताना दिसत आहेत. देशातील अशा प्रकारचा हा पहिलाच फ्लॉवर पार्क आहे. सहा एकर जागेत हा फ्लॉवर पार्क उभारण्यात आला आहे. त्यात ५० लाख फुलांचा आनंद एकाच वेळी घेता येणार आहे. सध्या २ लाख फुलांची रोपे लावण्यात आलेली आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here