दसर्‍याला झेंडूच्या फुलाला का आहे महत्त्व?

साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणजे दसरा. या दिवशी झेंडूच्या फुलाला एक वेगळाच मान दिला जातो. या दिवसात झाडांवर फुलं बहरु लागतात. तर झेंडूचे फुलं जणू काही हसू लागते. कारण या दिवशी घरोघरी सजावटीसाठी, पुजेसाठी, देव पूजा, शस्त्र पूजा, आयुध पूजा तसेच वापरातील यंत्र, वाहनं आणि प्रवेशद्वारावर सजावटीसाठी झेंडूचा वापर होतो. पण झेंडूचे फुल का खास आहे? झेंडूच्या फुलांना दसऱ्याच्या दिवशी इतकं महत्त्व का असते? जाणून घेऊया.