कोर्टाची पायरी चढायला घाबरणाऱ्या सर्वसामान्यांना कोर्टाने दिला आधार

Mumbai

कोर्टाची पायरी नको रे बाबा अशी प्रतिक्रिया नेहमीच अनेकांची असते. पण हेच नकोसे वाटणारे कोर्ट आता कोल्हापूरच्या 75कुटुंबाना हवेहवेसे वाटू लागले आहे. कोल्हापूर जिल्हाकोर्टात पुरामध्ये अडकलेल्या 75 कुटूंबाना आसरा देण्यात आला. बावड्यामध्ये राहणारी ही सर्व कुटूंब असून, या कुटूंबाना नुसता आसराच नाही तर त्यांची सर्व व्यवस्था देखील केली गेली. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कोल्हापूरच्या वतीने ही सर्व व्यवस्था करण्यात आली आहे.