राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांना आमदारकी कधी मिळणार?

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांच्या यादीवर अद्याप स्वाक्षरी केलेली नाही. राज्य सरकारने ६ नोव्हेंबर रोजी ही यादी राज्यपालांना पाठवली आहे. त्यासोबतच १५ दिवसांत या नावांवर शिक्कामोर्तब करावे, अशी शिफारस देखील राज्य मंत्रिमंडळाने केली होती. आता राज्यपाल यावर काय निर्णय घेतात, हे पाहावे लागणार आहे.